Devendra Fadnavis सैफ अली खान वरील हल्ला दुर्दैवी, पण लगेच मुंबईला असुरक्षित ठरवू नका; फडणवीसांनी ठणकावले!!

Devendra Fadnavis

विशेष प्रतिनिधी

मुंबई : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर काल मध्यरात्री कुणी हल्ला केला??, त्यामागचा उद्देश काय??, तो हल्ला कसा झाला??, याविषयी पोलिसांनी व्यवस्थित माहिती दिली आहे. त्यांचा तपास नीट सुरू आहे, पण एका हल्ल्यामुळे मुंबईला असुरक्षित ठरविण्याची गरज नाही, अशा स्पष्ट शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्या सकट सगळ्या विरोधकांना सुनावले.

सैफ अली खान याच्या बांद्रातल्या निवासस्थानी काल मध्यरात्री एका चोराने घरात घुसून त्याच्यावर चाकूने हल्ला केला. त्यात सैफ अली खान जखमी झाला. त्याच्यावर लिलावती रुग्णालयात लगेच शस्त्रक्रिया झाली सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे.

बांद्रातल्या ज्या परिसरात सैफ अली खान राहतो तिथे कडेकोट बंदोबस्त आहे. सैफ अली खानच्या सोसायटीत चार लेअर्सची सुरक्षा व्यवस्था मौजूद आहे, तरी देखील त्याच्यावर हल्ला कसा झाला ही सुरक्षा व्यवस्था कशी भेदली गेली, यासंदर्भात पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी सैफच्या घरातल्या तिघांना त्यासाठी ताब्यात घेतले आहे.

मात्र सैफ अली खान वरील हल्ल्याच्या मुद्द्यावरून शरद पवार, जितेंद्र आव्हाड वगैरे नेत्यांनी ताबडतोब शंका उपस्थित व्यक्त करून मुंबईतल्या कायदा सुव्यवस्थेवर चिंता व्यक्त केली, तर सुप्रिया सुळे यांनी समीक्षा कुटुंबीयांना फोन करून काही मदत हवी असल्यास आवर्जून सांगा, असे आवाहन केले. यातून मुंबईत किती असुरक्षित आहे, हेच दर्शविण्याचा सगळ्या नेत्यांचा फरक प्रयत्न राहिला.

मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या नेत्यांना स्पष्ट शब्दांत सुनावले. सैफ अली खान याच्यावरील हल्ला दुर्दैवी आहे. मात्र तो कुणी आणि का केला, या संदर्भात सर्व माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यांचा तपास सुरू आहे. या एका हल्ल्याच्या मुद्द्यावरून कुणी मुंबईला असुरक्षित ठरवायचा प्रयत्न करू नये, असे फडणवीस म्हणाले

Over attack on Bollywood actor Saif Ali Khan, Maharashtra CM Devendra Fadnavis

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात