विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने उमेदवार उभे केलेत 11, पण स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली 20 नेत्यांची!! या स्टार प्रचारकांच्या यादीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा पक्षाचे अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, राष्ट्रीय सरचिटणीस आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह 20 नेत्यांच्या समावेश आहे. विशेष म्हणजे पार्थ पवार यांचेही नाव या यादीत आहे. हे सर्व नेते दिल्ली विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या 11 उमेदवारांसाठी प्रचार करणार आहेत. Delhi vidhansabha NCP candidate
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने स्टार प्रचारकांच्या यादीत पक्षाचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते पाटील, राष्ट्रीय प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव, अविनाश आदिक, संजय प्रजापती, युवक आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा, विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष चैतन्य मानकर, दिल्ली प्रदेशाध्यक्ष वीरेंद्रसिंह यांचेही नाव आहे.
महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 8 कॅबिनेट मंत्री आणि एक राज्यमंत्री असे एकूण 9 मंत्री आहेत. असे असतानाही अजित पवार वगळता एकाही मंत्र्याच्या नावाचा समावेश दिल्ली विधानसभेसाठी स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश नाही.
पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अखंड असताना महाराष्ट्र बाहेरच्या कुठल्याही निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची किमान 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर व्हायची. उमेदवारांची संख्या फारच कमी असायची, पण स्टार प्रचारक 40 च्या आसपास असायचे. त्यामध्ये शरद पवार सुप्रिया सुळे यांच्या सकट महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या मंत्र्यांचाही समावेश असायचा, पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून मात्र स्टार प्रचारकांची संख्या एकदम घटवून ती दिल्लीत तरी 20 वर आणली आहे. शिवाय महाराष्ट्रातल्या कुठल्याच कॅबिनेट मंत्र्यांचा त्यात समावेश नाही
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App