विशेष प्रतिनिधी
मोहोळ : मराठी आरक्षणाच्या मुद्द्याने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला मराठा आरक्षणाबद्दल लवकरात लवकर निर्णय न झाल्यास पुणे ते मुंबई लॉंग मोर्चा काढण्यात येईल असा इशारा दिला आहे.
‘… otherwise Pune to Mumbai Long Morcha will be taken out’: Chhatrapati Sambhaji Raje
आज छत्रपती संभाजीराजे जनसंवाद यात्रेनिमित्त सोलापूर जिल्हा दौऱ्यावर असताना मोहोळमध्ये पत्रकारांशी चर्चा करताना पुणे ते मुंबई असा लाँग मार्च काढणार असल्याचे सांगितले आहे. ते यावेळी म्हणाले, “लाँग मार्चची घोषणा केली असली तरी लाँग मार्च व्हावा अशी आमची अजिबात इच्छा नाहीये. गेल्या सात- आठ महिन्यात आम्ही अनेकदा राज्य शासनासमोर मराठा आरक्षणा बाबत अनेक प्रश्न मांडले आहेत. आरक्षणाच्या बाबतीत असो किंवा इतर कोणत्याही बाबतीत असो, राज्याने व केंद्राने आपापली जबाबदारी पार पाडायला हवीच.”
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पूर रोखण्याची गरज खासदार संभाजीराजेंकडून पुराची पाहणी
संभाजीराजे पुढे म्हणाले, “आरक्षण हा एक मुद्दा आहेच पण त्या व्यतिरिक्त इतर मूलभूत सुविधाही आहेत. त्या बद्दल आम्ही वेळोवेळी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. मूक आंदोलन केले आहे. त्यातूनही काही निष्पन्न होत नाही असे दिसतेय. परवा त्यांनी आम्हाला एक पत्रही पाठवलं पण ते बोगस होतं. बोगस म्हणणं चुकीचं आहे. ते पत्र चुकीचं होतं कारण ते सरकारी बाबूंनी लिहिलेलं पत्र होतं. मी त्यांच्या पत्राला उत्तर दिलं की तुम्हाला चुकीचं कोणीतरी सांगितलं आहे. पण त्याला त्यांचं काही उत्तर आलेलं नाही. अशीच परिस्थिती असेल, गरीब मराठ्यांचं नुकसान होत असेल तर आम्हाला लाँग मार्च काढण्यावाचून पर्याय उरणार नाही”.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App