आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पूर रोखण्याची गरज खासदार संभाजीराजेंकडून पुराची पाहणी

विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : खासदार संभाजीराजे यांनी पूरपरिस्थितीची रविवारी पाहणी केली. दरवर्षी पूर येणार आहे, असे समजून त्यावर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मात केली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
कोल्हापूरला २०१९ मध्ये महापुराचा फटका बसला होता. मात्र यंदा त्याची धास्ती नाही, असे सांगताना ते म्हणाले. महामार्गावरील हायवे ग्रीन कॉरिडॉर होणे गरजेचे आहे.Use of modern technology to prevent flood : Sambhajiraje

आपत्कालीन स्थितीत शहराबाहेर पडता येत नाही. त्यामुळे शिरोली फाटा येथे ओव्हर ब्रिज हवा. अशा प्रकारच्या योजना सर्व राज्यात राबवल्या पाहिजेत. पूर रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर केला पाहिजे. दरवर्षी महापूर येणार आहेअसे समजून उपाययोजना केल्या पाहिजेत. योजना तात्पुरत्या नकोत त्या शाश्वत असल्या पाहिजेत. धरणातील, नदीतील वाळू काढली पाहिजे, अनधिकृत बांधकाम टाळली पाहिजेत, असे ते म्हणाले.

  • आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पूर रोखावा
  • दरवर्षी पूर येणार आहे, असे समजून योजना आखा
  • महामार्गावरील हायवे ग्रीन कॉरिडॉर होणे गरजेचे
  • आपत्कालीन स्थितीत शहराबाहेर पडता येत नाही
  •  शिरोली फाटा येथे ओव्हर ब्रिज उभारायला हवा
  • योजना तात्पुरत्या नकोत त्या शाश्वत पाहिजेत
  • धरणातील, नदीतील साचलेला गाळ काढला पाहिजे
  • अनधिकृत बांधकाम टाळली पाहिजेत

Use of modern technology to prevent flood : Sambhajiraje