विशेष प्रतिनिधी
मुंबई : अर्थसंकल्पाबाबत विरोधकांनी टीका करणे योग्य नाही. ‘ हा अर्थसंकल्प म्हणजे विकासाची आहे गंगा आणि विरोधकांनी घेऊ नये नरेंद्र मोदींशी पंगा ‘असे आपल्या खास शैलीत काव्य करीत आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास रामदास आठवले यांनी यंदाच्या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. Opposition should criticize the budget Reaction of Ramdas Athavale
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सन 2022-23 चा सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प हा दलित आदिवासी सह सर्व समाज घटकांना देणारा देशाची सर्वांगीण प्रगती करणारा परिपूर्ण अर्थसंकल्प असून भविष्यात भारताला जागतिक महासत्ता बनविण्याची बीजे पेरलेला हा अर्थसंकल्प आहे अशा शब्दात आठवले यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.
मोदी दूरदृष्टी असणारे नेते आहेत. त्यांच्या मार्गदर्शनात नेतृत्वात देश सतत प्रगतिपथावर आहे. भविष्यात भारत जागतिक महासत्ता ठरेल. त्यादृष्टीने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाची वाटचाल सुरू आहे. त्याचे प्रतिबिंब आज सादर झालेल्या अर्थसंकल्पात दिसत आहे.यंदाच्या अर्थसंकल्पात दलित आदिवासी शेतकरी कष्टकरी कामगार तसेच बेरोजगार युवकांना रोजगार यासह सर्व समाज घटकांचे कल्याण करणाऱ्या तरतुदी आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App