मराठा-ओबीसी आरक्षण मिळल्यावरच हारतुरे, फेटा स्वीकारणार – पंकजा मुंडे यांचा निर्धार

वृत्तसंस्था

बीड : मराठा आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही. तोपर्यंत हारतुरे आणि फेटा स्वीकारणार नाही, अशी आक्रमक भूमिका भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी घेतली आहे. Only after getting Maratha-OBC reservation,I Will accept Flower Garland’s And feta: Pankaja Munde’s decision

बीड शहरामध्ये जिल्ह्यातील राजपूर बूथ कार्यकर्त्यांकडून आयोजित केलेल्या वर्कशॉपमध्ये पंकजा मुंडे बोलत होत्या.



पंकजा मुंडे म्हणाल्या, “मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत बीड जिल्ह्यानं नवा आदर्श घालून दिला पाहिजे. आजपासून कोणीही मला हार घालणार नाही. मी मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय मार्गी लागत नाही, तोपर्यंत हारतुरे स्वीकारणार नाही.

तसेच ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न निकाली लागत नाही. तोपर्यंत फेटाही बांधणार नाही. समाज बंधावांनी मराठा-ओबीसीमध्ये वाद पेटविणाऱ्यांपासून सावधान व्हावे. तसेच छत्रपती शिवरायांचा ​सामाजिक अभिसरणाचा आदर्श घेण्याची गरज आहे.”

Only after getting Maratha-OBC reservation,I Will accept Flower Garland’s And feta: Pankaja Munde’s decision

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात