वृत्तसंस्था
पुणे : पुण्यात सध्या चक्रीवादळामुळे ढगाळ आणि पावसाळी वातावरण आहे. मे महिना असूनही उन्हाचा तडाखा जाणवत नाही. दुसरीकडे आगीच्या घटना मात्र, वाढल्या आहेत. शनिवारी रात्री तर तेल, तुपाचे गोदाम आगीत भस्मसात झाले. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.Oil and butter Godown Destroyed due to Fire in pune. Short circuit is the reason as per Fire extinguisher
पुणे-सासवड रोडवरील वडकी गावातील तेल आणि तुपाच्या गोदामालाला शनिवारी भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
पुणे सासवड रोडवरील वडकी गावात तेल आणि तुपाचे गोदाम आहे. शनिवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ही आग लागण्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली.
अग्निशमन बंब आणि जवान काही मिनिटात घटनास्थळी दाखल झाले. मात्र तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. या आगीत गोदाम पूर्णपणे भस्मसात झाले असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची शक्यता आहे. अग्निशमनच्या पाच बंबाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App