Todays Corona Cases In India, Latest Updates On Coivd-19

Corona Cases In India : देशातील कोरोना रुग्णसंख्येत कमालीची घट, २४ तासांत ४ हजारांहून जास्त मृत्यूंमुळे चिंता कायम

Corona Cases In India : देशातील कोरोना रुग्णसंख्येत मागच्या तीन दिवसांपासून घट होताना दिसत आहे. तथापि, मृतांच्या संख्येत अद्याप दिलासा मिळालेला नाही. सर्वाधिक प्रादुर्भाव झालेल्या महाराष्ट्र आणि दिल्लीतही कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट नोंदवण्यात आली आहे. त्याच वेळी, दक्षिण भारतात कोरोना संसर्गाची गती अजूनही जास्त आहे. केरळ आणि कर्नाटकसह दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. Todays Corona Cases In India, Latest Updates On Covid-19


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशातील कोरोना रुग्णसंख्येत मागच्या तीन दिवसांपासून घट होताना दिसत आहे. तथापि, मृतांच्या संख्येत अद्याप दिलासा मिळालेला नाही. सर्वाधिक प्रादुर्भाव झालेल्या महाराष्ट्र आणि दिल्लीतही कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट नोंदवण्यात आली आहे. त्याच वेळी, दक्षिण भारतात कोरोना संसर्गाची गती अजूनही जास्त आहे. केरळ आणि कर्नाटकसह दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, मागच्या 24 तासांत कोरोनाचे 3,11,170 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर कोरोनामुळे 4077 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या 36 लाखांहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी (16 मे 2021) सकाळी 8 वाजता कोरोनाची आकडेवारी जाहीर केली.

मागच्या 24 तासांतील रुग्णसंख्या – 3,11,170
मागच्या 24 तासांत बरे झालेले रुग्ण – 3,62,437
मागच्या 24 तासांतील एकूण मृत्यू – 4,077
देशातील कोरोनाची एकूण रुग्णसंख्या – 2,46,84,077
आतापर्यंत देशात बरे झालेल्या रुग्णांची संख्या – 2,07,95,335
देशातील कोरोनामधील एकूण मृतांचा आकडा – 2,70,284
देशातील सक्रिय रुग्णसंख्या – 36,18,458
एकूण लसीकरण – 18,22,20,164

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सांगितले की, देशातील कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी 85 टक्के रुग्ण 10 राज्यांतील आहेत. 11 राज्यांत एक लाखाहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत. देशातील 24 राज्यांत संसर्ग दर 15 टक्क्यांहून अधिक आहे. तथापि, भारतातील कोरोनातून बरे होण्याचा दर हा 83 टक्क्यांवर गेला आहे.

महाराष्ट्रात 4 लाख 94 हजारांहून सक्रिय रुग्ण

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. एका दिवसात महाराष्ट्रात कोरोनाचे 34 हजार 848 नवीन रुग्ण आढळले, तर 59 हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. परंतु याच काळात 960 रुग्णांच्या मृत्यूंमुळे चिंता वाढली आहे. सध्या महाराष्ट्रात कोरोनाचे 4 लाख 94 हजारांहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत.

Todays Corona Cases In India, Latest Updates On Covid-19

महत्त्वाच्या बातम्या