विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील ओमीक्रोन बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.दरम्यान नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबरच्या रात्री मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असते.याच पार्श्वभूमीवर काल ( ३० डिसेंबरला ) रात्री उशिरा राज्य सरकारने नवी नियमावली जारी करण्यात आली आहे.दरम्यान सकाळपासून ( ३१ डिसेंबर ) हे नविन निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रम आणि लग्नसोहळे फक्त ५० लोकांच्या उपस्थितीत करता येणार आहेत. तर अंत्यसंस्कारासाठी २० लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. स्थानिक प्रशासनाला कडक निर्बंध लावण्याची मुभा देण्यात आली आहे.
#ओमायक्रॉन विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने नवीन निर्देश जारी केले आहेत. लग्न समारंभासह इतर कार्यक्रमांसाठी ५० तर अंत्यसंस्कारासाठी २० जणांच्या उपस्थितीची मर्यादा घालण्यात आली आहे. pic.twitter.com/0HzOFGmoZZ — MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) December 30, 2021
#ओमायक्रॉन विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने नवीन निर्देश जारी केले आहेत. लग्न समारंभासह इतर कार्यक्रमांसाठी ५० तर अंत्यसंस्कारासाठी २० जणांच्या उपस्थितीची मर्यादा घालण्यात आली आहे. pic.twitter.com/0HzOFGmoZZ
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) December 30, 2021
राज्यात ओमायक्रॉनबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने प्रशासनाच्या चिंतेत आणखीच भर पडली आहे.नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी सुरू असताना दुसरीकडे कोरोनाने नागरिकांची चिंता वाढवली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App