विशेष प्रतिनिधी
मुंबई : एसटीचा संप मिटत नसल्याने आता राज्य शासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांना धमक्या दिल्या जाऊ लागल्या आहेत. हजर व्हा,अन्यथा कामावरून काढून टाकू अशा नोटीसा एसटीतील २२९६ रोजंदारी कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.Notice to 2296 contractual employees of ST
गेल्या तीन आठवड्यापासून आंदोलन करणाऱ्या संपकरी कर्मचाऱ्यांवर एसटी महामंडळाने कारवाई सुरू केली आहे. आता या संपामुळे महामंडळातील कंत्राटी कामगारांनाही मोठा फटका बसला असून २२९६ रोजंदारी कामगारांना सेवा समाप्तीची नोटीस महामंडळाकडून बजावण्यात आली आहे. त्यामुळे आता कारवाई केलेल्या कामगारांची संख्या ४ हजार ३४९ वर गेली आहे.
एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करा, या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत. हा संप फोडण्यासाठी एसटी महामंडळाने निलंबनाची कारवाई सुरू केली होती. न्यायालयाचे निर्देश असतानाही कामगार संपावर गेल्यामुळे महामंडळाने कारवाई सुरू केली आहे.
आतापर्यंत महामंडळाकडून २ हजार ५३ एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. आता याच पाठोपाठ एसटी महामंडळात रोजंदारीने काम करणाऱ्या २२९६ कर्मचाऱ्यांनाही सेवा समाप्तीची नोटीस बजावली आहे.
ज्यामध्ये चालक २९, चालक तथा वाहक २१८८, वाहक १८२, सहाय्यक ९७ आणि लिपिक टंकलेखक ८८ असे २२९६ रोजंदारी कामगारांचा समावेश आहे. यापूर्वी २१७८ एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App