विशेष प्रतिनिधी
नाशिक : मुख्यमंत्री कुठेही अगदी मंत्रालयात तसेच कॅबिनेटच्या बैठकींनाही जात नाहीत. मुख्यमंत्रीच नव्हे, तर महाराष्ट्रच आजारी पडल्याची टीका केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम मंत्री नारायण राणे यांनी केली. महाराष्ट्रात सध्या विचित्र परिस्थिती निर्माण झाल्याचेही ते म्हणाले.Not only the Chief Minister, but also Maharashtra is sick, Narayan Rane’s criticism
नाशिक महापालिकेतर्फे आयटी हबच्या प्रोत्साहनासाठी नाशिक आयटी इन्क्लेव्ह २०२२ चे आयोजन मंगळवारी येथे करण्यात आले होते. यावेळी राणे म्हणाले, राज्यात अनेक मंत्री घोटाळ्यात अडकले आहेत. अनेकांची मंत्रालयातील खुर्ची हलते आहे. त्यामुळेच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मंत्रालयात जायलाही घाबरतो.
दिशा सालियनवर अत्याचार झाले. तिच्या मारेकऱ्यांवर कारवाई करावी आणि तिला न्याय मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी आम्हाला साथ दिली पाहिजे. दिशाचे तिच्या कुटुंबीयांशी पटत नसल्याने मुळातच ती त्यांच्यासमवेत राहत नसल्याचे राणे यांनी सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App