विशेष प्रतिनिधी
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी राज्याचे गृहमंत्रीपद स्वीकारताच दोन अत्यंत महत्त्वाची विधाने केली आहेत. त्यातले पहिले विधान आपला प्रशासनात राजकीय हस्तक्षेप राहणार नाही, हे आहे, तर अधिकाऱ्यांच्या निष्ठा कोणाशी आहेत, हे पाहून निर्णय घेणार असल्याचे त्यांनी दुसरे विधान केले आहे. No political interference in home department, says new home minister dilip valse patil
गृहमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यावर पत्रकारांशी बोलताना दिलीप वळसे पाटील म्हणाले, की सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. स्वच्छ प्रशासन हा माझा प्रयत्न राहील, प्रशासनात माझा कुठलाही राजकीय हस्तक्षेप असणार नाही. गृह विभाग हा एक काटेरी मुकुट आहे. याआधीही जबाबदारी पार पडली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये समन्वय आहे आणि राहील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लवकरच भेट घेणार आहे, असेही पाटील यांनी सांगितले.
दिलीप वळसे पुढे म्हणाले, की काल अचानक पक्षाने ही जबाबदारी दिली. अधिकाऱ्यांची निष्ठा कोणाशी आहे ती समोर आली की निर्णय घेणार आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५ वर्षे राज्याचे गृहमंत्रीपद सांभाळले आहे. त्यांचे अनेक अधिकाऱ्यांशी संबंध असू शकतात, असे सूचक विधानही वळसे पाटलांनी केले.
त्यामुळे या विधानांची लगेच राजकीय तसेच पोलीस वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. नव्या गृहमंत्र्यांच्या दोन विधानांमधली राजकीय विसंगती देखील अनेकांनी सोशल मीडियातून दाखवून दिली आहे.
त्याच बरोबर आता गृह विभागात राजकीय हस्तक्षेप असणार नाही, असे विधान करून आधीच्या गृहमंत्र्यांबद्दल नवे गृहमंत्री काही वेगळे सूचित करू इच्छितात काय, याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App