भाजपला पुढील ४० ते ५० वर्ष कोणी हरवू शकणार नाही , चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्याला उदय सामंत यांनी दिले प्रत्युत्तर ; म्हणाले….

मंत्री उदय सामंत हे रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. शासकीय विश्रामगृहात त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना विविध मुद्यावर आपले मत व्यक्त केले.No one will be able to defeat BJP for next 40 to 50 years, Uday Samant replied to this statement of Chandrakant Patil; Said ….


विशेष प्रतिनिधी

मुंबई : विरोधक आणि महाविकास आघाडीतील संघर्ष आता टोकाला गेला आहे. दोन्ही पक्षातील नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत.अशातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एक विधान केले आहे. भाजपला पुढील ४० ते ५० वर्ष कोणी हरवू शकत नसल्याचे पाटील म्हटले.

मंत्री उदय सामंत हे रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. शासकीय विश्रामगृहात त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना विविध मुद्यावर आपले मत व्यक्त केले.यावेळी चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.



यावेळी मंत्री उदय सामंत म्हणाले की, कोणी काय म्हणावे हा प्रत्येकाचा भाग आहे. कारण सगळ्यांना माहित आहे एका रात्री सरकार पडणार होत.दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी जी मांडलेली भूमिका ही की भाजपला पुढील ४० ते ५० वर्ष कोणी हरवू शकणार नाही.ही भूमिका चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे कार्यकर्ते साबित राहावेत यासाठी मांडलेली आहे.

पुढे सामंत म्हणले की , भाजपची अनेक लोक शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या संपर्कात आहेत. हे कार्यकर्ते कुठे जाऊ नयेत, त्यांचा मॉरल वाढावा यासाठी पाटील यांनी हे वक्तव्य केले असावे, असा टोलाही सामंत यांनी लगावला.

No one will be able to defeat BJP for next 40 to 50 years, Uday Samant replied to this statement of Chandrakant Patil; Said ….

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात