“इंडिया” नाव हटविण्याचा अधिकार कोणालाही नाही; शरद पवारांचा जळगावात दावा; पण वस्तुस्थिती काय??

विशेष प्रतिनिधी

जळगाव : “इंडिया दॅट इज भारत” असे राज्यघटनेत नमूद केले आहे. मात्र, संसदेच्या विशेष अधिवेशनात केंद्र सरकार राज्यघटनेतील इंडिया नाव हटविण्याच्या बेतात असल्याची दिल्लीच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. No one has the right to delete the name India

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी वेगळाच दावा केला आहे. इंडिया किंवा भारत या वादात मी पडत नाही. पण इंडिया नाव हटविण्याचा कोणालाही अधिकार नाही, असा दावा शरद पवारांनी जळगाव मधून केला आहे. जळगावत जाहीर सभेपूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये पवारांनी अनेक वक्तव्य केली. त्यापैकी “इंडिया” आघाडी आणि इंडिया नाव यासंदर्भातले वक्तव्य आहे.

जी 20 च्या निमंत्रण पत्रिकेत “प्रेसिडेंट ऑफ इंडिया” या ऐवजी “प्रेसिडेंट ऑफ भारत” असे नमूद केले आहे. या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पवारांनी इंडिया नाव कोणाला हटवण्याचा अधिकार नसल्याचा दावा केला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी “इंडिया” आघाडीची उद्या दिल्लीत बैठक बोलावली आहे. त्यामध्ये या गोष्टींवर चर्चा करण्यात येईल. पण आपण इंडिया अथवा भारत या वादात पडू इच्छित नाही असेही पवार म्हणाले.

वस्तुस्थिती काय??

“इंडिया दॅट इज भारत” हे घटनेच्या सरनाम्यात अर्थात प्रिएंबलमध्ये नमूद केले आहे. घटनेच्या सरनाम्यात इंदिरा गांधींनी बदल करून त्यामध्ये “धर्मनिरपेक्षता” आणि “समाजवाद” हे शब्द समाविष्ट केले होते. त्यामुळे जर मोदी सरकारने सरनाम्यातले इंडिया नाव हटवायचे ठरवले असेल, तर इंदिरा गांधींनी सरनाम्यात बदल करण्याचा जो पायंडा पाडला, त्याच पायंड्यावरून मोदी सरकार पुढे जात आहे, असे मानावे लागेल त्यामुळे इंडिया नाव बदलण्याचा कोणालाही अधिकार नाही, हा पवारांचा दावा खोटा पडण्याची शक्यता आहे.

No one has the right to delete the name India

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात