प्रतिनिधी
मुंबई : कोरोनाची लाट रोखण्यात अपयश, कोरोना हॉस्पिटल उभारणीमध्ये भ्रष्टाचार तसेच अपयश, कायदा-सुव्यवस्था राखण्यात अपयश, बेरोजगारी दर कमी करण्यात अपयश… अशी सगळीकडे महाराष्ट्राची मोठी घसरगुंडी सुरू आहे, अशा शब्दांमध्ये विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत ठाकरे – पवार सरकारचे वाभाडे काढले. अंतिम आठवडा प्रस्तावावर ते बोलत होते. No – law and order and unemployment everywhere in Maharashtra
एकापाठोपाठ एक मुद्दे उपस्थित करत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे – पवार सरकारच्या दोन वर्षातल्या अपयशाचा मोठा पाढा वाचला. महाविकास आघाडीच्या राजवटीत कोरोना फक्त मंदिरांमध्ये किंवा सर्वसामान्यांना होतो. सत्ताधारी पक्षांच्या मेळाव्यांमध्ये, त्यांच्या मुलांच्या लग्नांमध्ये कोरोना होत नाही, असा टोला त्यांनी लगावला. आपल्या भाषणाचे मुद्दे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटरवर हँडलवर शेअर केले आहेत. ते असे :
महाराष्ट्रात सर्वाधिक बेरोजगारी दर
पीएलएफएस अहवाल महाराष्ट्र : 22.6 टक्के, झारखंड : 19.8 टक्के केरळ : 18.9 टक्के जम्मू-काश्मीर : 17.4 टक्के ओरिसा : 16.5 टक्के तेलंगणा : 15.4 टक्के अशा राज्यांसोबत महाराष्ट्राची तुलना यापूर्वी कधीही होत नसे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App