विशेष प्रतिनिधी
पुणे : राज्यातील महाविद्यालयांमध्ये पारंपरिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार नाहीत. इयत्ता बारावीच्या गुणांच्या आधारेच या अभ्यासक्रमास प्रवेश देण्यास महाविद्यालयांनी सुरुवात करावी, असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. No CET admission process for traditional courses, BA, B.Com, B.Sc admissions will be direct, informed Uday Samant
तसेच महाविद्यालयांचे पुढील सत्र ऑफलाइन पद्धतीने सुरू व्हावे, याबाबत येत्या आठ दिवसांत आढावा घेऊन निर्णय जाहीर केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. बुधवारी राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत झालेल्या बैठकीत या प्रवेशासाठी सीईटी घेतली जाणार नसल्याचा निर्णय झाल्याचे सामंत यांनी सांगितले.
मागील वर्षाच्या तुलनेत यंदा बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ३३ हजार ९०८ ने वाढली आहे. त्यामुळे महाविद्यालयांना तुकडी वाढ किंवा विद्यार्थी प्रवेश क्षमतावाढ देण्याबाबत कुलगुरूंनी तात्काळ निर्णय घ्यावा. संदर्भातील प्रस्ताव येत्या ३१ ऑगस्ट पूर्वी राज्य शासनाला सादर करावेत, असेही सामंत त्यांनी नमूद केले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App