निनावी पत्रावरून कारवाई नाही; नवाब मलिकांचे आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह!!

वृत्तसंस्था

मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकाऱ्याने आपल्याला निनावी पत्र पाठविल्याचे महाराष्ट्रातील ठाकरे – पवार सरकारचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिकांनी सांगितले होते. ते पत्र पुढील कारवाईसाठी मलिकांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडे पाठविले. मात्र, त्या पत्राची शहानिशा करून त्या निनावी पत्रावरून कोणतीही कारवाई न करण्याचा निर्णय नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने घेतला आहे. No action from anonymous letter; Nawab Malik now questions the credibility of the Narcotics Control Bureau !!

मात्र, या निर्णयावरूनच नवाब मलिकांनी आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. संबंधित पत्रावर कोणाचे नाव नाही. कोणाची स्वाक्षरी देखील नाही. हे नवाब मलिकांनी कबूल केले आहे. मात्र, त्यातल्या कंटेटच्या आधारावर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने कारवाई केली पाहिजे, असे नवाब मलिकांचे म्हणणे आहे. हे पत्र नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडे सोपविले तेव्हा त्यावर कारवाई करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी काल सकाळी सांगितले होते. पण सायंकाळी मात्र, कारवाई करण्याचे नाकारले. त्यामुळे संपूर्ण नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या विश्वासार्हतेबद्दलच संशय निर्माण होतो, असे नवाब मलिक म्हणाले.



या निनावी पत्रात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या कथित भ्रष्टाचाराचा उल्लेख आहे. ते अनेकांना खोट्या केसेसमध्ये अडकवून पैसे घेतात, असा आरोप या निनावी पत्रात करण्यात आला आहे. संबंधित पत्र नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकाऱ्याने पाठविल्याचा नवाब मलिकांचा दावा आहे. या पत्रावर कोणाचे नाव नाही. स्वाक्षरीही नाही, हे नवाब मलिकांनी कबूल केले आहे. तरीही या पत्राच्या आधार घेऊन नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने कारवाई केली पाहिजे. कारण त्यातला कंटेट महत्त्वाचा आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने या निनावी पत्राच्या आधारे कारवाई केली नाही, तर संपूर्ण संस्थेच्याच विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण होईल, असा दावाही त्यांनी केला आहे.

नवाब मलिकांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या विश्वासार्हतेवर जे प्रश्नचिन्ह लावले आहे, त्यावर संस्थेचे नेमके काय म्हणणे आहे, हे समोर येण्याची प्रतीक्षा आहे.

No action from anonymous letter; Nawab Malik now questions the credibility of the Narcotics Control Bureau !!

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात