प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेसची अवस्था उत्तर प्रदेशातल्या रया गेलेल्या हवेलीच्या जमीनदारासारखी झालेली आहे, अशी बोचरी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली होती. त्यावर काँग्रेसकडून सर्वात टोकदार प्रतिक्रिया ठाकरे – पवार सरकारमधील ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केली आहे.Nitin Raut targets Sharad Pawar over his remarks on congress
शरद पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री कधीही महाराष्ट्रात बसवता आलेला नाही. या विषयावरून राऊत यांनी पवारांना टोचले आहे. ममता बॅनर्जी, मायावती यांनी बहुमत मिळून पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश जिंकून दाखवले.
त्या मुख्यमंत्री झाल्या पण ज्यांना स्वतःच्या पक्षाचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात कधीही बसवता आलेला नाही ते काँग्रेसकडे बोट दाखवत आहेत. त्यापेक्षा त्यांनी स्वतःकडे पहावे, अशा बोचऱ्या शब्दात नितीन राऊत यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
या आधी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पवारांवर टीका केली होती. ज्यांना काँग्रेसने जमीन राखायला दिली त्या राखणदारांनीच जमीन हडपली, अशा शब्दांत नाना पटोले यांनी शरद पवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला होता. त्यानंतर नितीन राऊत यांनी पवारांवर टीका केली आहे. काँग्रेसवरची पवारांची टीका यापुढे सहन करणार नाही, असा इशाराही राऊत यांनी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App