विशेष प्रतिनिधी
मुंबई : Nitesh Rane अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याला ठाणे आणि मुंबई पोलिसांच्या संयुक्त कारवाईमध्ये शनिवारी रात्री उशीरा अटक केली. ठाण्यातील कासारवडवली येथून त्याला ताब्यात घेतले. हा आरोपी बांगलादेशचा असल्याची शक्यता असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. यावरून बांगलादेशींविरोधात आक्रमक मोहिम राबवण्यात येईल, असा इशारा भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी दिला आहे. मातोश्रीवर या हिरव्या सापांना दूध पाजणारे वावरतात, असा घणाघात त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केला.Nitesh Rane
सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव मोहम्मद शहजाद असून तो बांगलादेशी घुसखोर असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. याच मुद्यावरून राज्याच्या राजकारणात बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न चर्चेत आला आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी थेट केंद्रीय गृहमंत्र्यांना प्रश्न सवाल केला. आरोपी बांगलादेशातील असतील तर हे केंद्रीय गृहमंत्र्यांचे अपयश आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली होती. या टीकेला भाजप आमदार नीतेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
मातोश्रीवर या हिरव्या सापांना दूध पाजणारे वावरतात
विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत मत मिळवण्यासाठी, स्वतःच्या भावाला निवडून आणण्यासाठी बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमानांचे मतदान मिळवण्यात आले. इतक्या वर्षापासून उद्धव ठाकरे यांची मुंबई महापालिकेवर सत्ता आहे. पण त्यांनी काहीच केले नाही. उलट मातोश्रीवर या हिरव्या सापांना दूध पाजणारे वावरतात, असा हल्लाबोल नीतेश राणे यांनी केला.
ही घाण राज्याच्या बाहेर काढणार
बांगलादेशी आज सैफअली खानच्या घरात घुसले आहेत, उद्या तुमच्या आमच्या घरात घुसतील. या सापांना ज्यांनी दुध पाजले त्यांची नावे आमच्याकडे आहेत. आम्ही ही घाण राज्याच्या बाहेर काढणार आहोत. मुंबई पालिकेतील अधिकारी आणि काही लोक यांनी बांगलादेशी पाळले आहेत, असा आरोपी नीतेश राणे यांनी केला. बांगलादेशींना पाळणाऱ्यांनी पण बांग्लादेशात निघून जायची तयारी करा, असा इशारा मंत्री नितेश राणे यांनी दिला आहे.
बांगलादेशींना बळ देणारे समोर येतील
बांगलादेशींना मदत करणारे बडी धेंडे आहेत. यामागे मोठे रॅकेट आहे. सिस्टीमच्या आत राहून बांगलादेशींना कागदपत्रे पुरवले जातात. यात शासकीय अधिकारी आणि काही राजकीय नेत्यांचाही सहभाग आहे. बांगलादेशींना बळ देणारे काही राजकीय नेते व त्यांचे अड्डे समोर येतील. तसेच अशी मदत करणारे पक्ष कोणते आहेत त्यांची नावेही समोर येतील, असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला.
आव्हाड, सुप्रिया सुळेंवर निशाणा
ठाण्याचे जितुद्दीन आणि बारामतीच्या ताई आज सैफवरचा हल्लेखोर बांगलादेशी आहे हे समजल्यावर गप्प का? असा सवाल करत नीतेश राणे यांनी अप्रत्यक्षपणे जितेंद्र आव्हाड आणि सुप्रिया सुळे यांच्यावरही निशाणा साधला. भंगारविक्रेते, फूड डिलीव्हरीच्या माध्यमातून बांगलादेशी घरांपर्यंत पोहोचतात. शून्य बांगलादेशी हे आमच्या सरकारचं टार्गेट आहे. महाराष्ट्रात एकही बांगलादेशी ठेवणार नाही. बांगलादेशी सापांना दूध पाजणा-यांचाही मुखवटा फाडणार, असेही ते म्हणालेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App