विशेष प्रतिनिधी
मुंबई : प्रत्यक्ष निवडणुकीला उभे न राहता याला पाड, त्याला पाड अशी भाषा वापरणाऱ्या मराठा आरक्षण आंदोलक जरांगे यांच्या आक्रमक भाषेला आत्तापर्यंत भाजपचे नेते तितक्या आक्रमकपणे उत्तर देत नव्हते. परंतु आता थेट मनोज जरांगे यांना शिंगावर घ्यायची हिंमत भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh rane) यांनी दाखविली.
मनोज जरांगेच्या दाढी विषयीच आता संशय यायला लागला आहे. मनोज जरांगेच्या आंदोलनाचा फायदा मराठा समाजाला कमी आणि मुस्लिम समाजाला फायदा जास्त झाला. त्यामुळे मनोज जरांगेच्या रूपाने मराठा समाजामध्ये आधुनिक मोहम्मद अली जिना आला नाही ना??, असा प्रश्न विचारला जातं आहे, अशी घणाघाती टीका नितेश राणे यांनी केली. मनोज जरांगे गोधडीत असताना नारायण राणेंनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिले, असा तडाखा देखील नितेश राणे यांनी हाणला.
नितेश राणे म्हणाले :
नारायण राणे आणि प्रवीण दरेकर सत्य सांगत आहेत. हे दोन्ही नेते मराठा समाजाचे प्रबोधन करत आहेत . मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा मराठा समाजाला कमी फायदा झाला. त्यांच्या आंदोलनाचा मुस्लिम समाजाला फायदा जास्त झाला. त्यामुळे त्यांना आता मराठा समाजात मनोज जरांगेंच्या रूपाने आधुनिक मोहम्मद अली जिना आला नाही ना??, असा प्रश्न विचारला जातो आहे. मराठ्यांसाठी लढताय की मराठ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मुस्लिमांसाठी लढताय??
मनोज जरांगे गोधडीत असताना नारायण राणे आरक्षण मिळवून दाखवले आहे. मनोज जरांगे तुझ्या शाळेत राणे आणि दरेकर प्राध्यापक होते. मनोज जरांगेच्या दाढीवर आतां संशय यायला लागला आहे. नक्की तू मराठा आहेस, की आधुनिक महम्मद अली जिना??
राज ठाकरे विरोधात सुपारी आंदोलन करायला सांगायचे आणि मग पॅन्ट पिवळी झाली की ते आमचे नाहीत. हे फक्त राऊत आणि उद्धव ठाकरे करू शकतो. कुठलाही कडवट मराठा असे करणार नाही. उबाठाचे महाविकास आघाडीचे आणि तुतारीचे कार्यकर्ते होते. मराठा आंदोलकांना बदनाम करण्याची हिंमत संजय राऊत यांनी करू नये.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी महाविकास आघाडीच्या काळात वसुली कशी व्हायची ते काल सांगितलं. उद्धव ठाकरे आणि अनिल देशमुख, संजय राऊत तुम्ही खरंच मर्द असाल तर परमबीर सिंहसोबत नार्को टेस्ट घेऊन दाखवा. तुमचा बुरखा फाडण्याचं काम परमबीर सिंह करत आहेत.
महाविकास आघाडीचे नेते तेव्हा काय करायचे हे 90 % बाहेर येईल. परमबीर सिंह यांनी दिशा सालियन आणि सुशांत सिंगच्या हत्येच्या काळात आयुक्त होते. तेव्हा जे घडलं ते सगळं त्यांना माहिती आहे. उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल करण्यासाठी महाविकास आघाडीच्या कुठल्या नेत्याकडे ते फुटेज आहे, हेही आम्हाला माहिती आहे. येत्या विधानसभा निवडणुकीच्या काळात उद्धव ठाकरेला ब्लॅक मेल करण्यासाठी ते फुटेज वापरले जाणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App