विशेष प्रतिनिधी
मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्यानिमित्त मुंबईमध्ये निर्भया पथकाचे उद्घाटन करण्यात आले. समाजकंटक, महिलांची छेड काढणाऱ्यांवर कठोर कारवाई हे पथक करेल. तसेच जनजागृती आणि शिक्षण देण्याचेही काम पथकाकडून केले जाईल. शाळा कॉलेजमध्ये जाऊन कार्यक्रमांच्या माध्यमामधून सुरक्षित वातावरण तयार करण्याचं काम हे पथक करेल. Nirbhaya Pathak active in Mumbai Strict action against those who molest women
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार सुप्रिया सुळे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, पालक मंत्री आदित्य ठाकरे व अस्लम शेख यांच्या उपस्थितीत निर्भया पथकाचे उद्घाटन करण्यात आले.
१०३ हा हेल्पलाईन नंबर डायल केल्यानंतर निर्भया पथकाची मदत मिळणार आहे. यासाठी पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांना डेटा सुविधासह फोन उपलब्ध करून देण्यात आले आहेत मुंबईमधील ९१ पोलीस स्थानकांमध्ये हे पथक सक्रीय हे पथक प्रो अॅक्टीव्ह म्हणजेच तक्रारीऐवजी स्वत:हून दखल घेत कारवाई करणार आहे आणि रिअॅक्टीव्ह म्हणजेच तक्रारींवर आधारित कारवाई करणार आहे.
हे पथक प्रोअॅक्टीव्ह आणि रिअॅक्टीव्ह दोन्ही पद्धतीचं पोलिसिंग करणार आहे. क्यूआर कोड बेस पोलिसिंगचा एक प्लॅन या पथकाकडे देण्यात आलाय. सुरक्षित असल्यासंदर्भातील भावना वाढणे हे या पथकाकडून अपेक्षित आहे, असे सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले.
अर्भक ते वार्धक्य या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर महिलांवरील अत्याचाराला प्रतिबंध करणे, अत्याचार होत असल्यास हस्तक्षेप करून तिला सुरक्षितता देणे, गुन्ह्यांचा त्वरीत तपास करणे, कोर्टातील प्रकरणांचा पाठपुरावा करणे हे बृहन्मुंबई पोलीस दलाचे प्राधान्याचे काम असल्याचे मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी प्रास्ताविकात सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App