मुलीने यकृत दान करून वडिलांना दिले जीवनदान ; अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईमध्ये झाली शस्त्रक्रिया


अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईने पश्चिम भारतामध्ये १५० हुन जास्त यकृत प्रत्यारोपणे केली आहेत. लहान मुलांमधील यकृत प्रत्यारोपणाच्या बाबतीत ‘सेंटर ऑफ एक्सेलन्स’ म्हणून हे ओळखले जाते.Daughter donates liver and gives life to father; The surgery took place at Apollo Hospitals Navi Mumbai


विशेष प्रतिनिधी

नवी मुंबई : अवयव दानाबाबत नेहमीच चर्चा होत असते. परंतु याबाबत अजून फारशी जागृती झालेली नाही. दरम्यान यावेळी वडिलांसाठी मुलीने अनोख्या दातृत्वाचा आदर्श समाजासमोर ठेवलं आहे.२२ वर्षांच्या प्रियंका सेलने आपल्या वडिलांचे प्राण वाचवण्यासाठी आपल्या यकृताचा एक भाग दान केला. अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईमध्ये यकृत प्रत्यारोपण केले गेले.प्रियंकाचे वडील दिलीप सेल मुंबई पोलीस (मालाड पोलीस स्टेशन) मध्ये पीएसआय आहेत.शस्त्रक्रियेनंतर ते पूर्णपणे बरे झाले आणि प्रत्यारोपणानंतर काही महिन्यांच्या आत त्यांना पोलीस सब इन्स्पेक्टरचे प्रमोशन देखील मिळाले.

अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईने पश्चिम भारतामध्ये १५० हुन जास्त यकृत प्रत्यारोपणे केली आहेत. लहान मुलांमधील यकृत प्रत्यारोपणाच्या बाबतीत ‘सेंटर ऑफ एक्सेलन्स’ म्हणून हे ओळखले जाते. यकृत प्रत्यारोपण सर्जरी झालेले रुग्ण दीर्घकाळपर्यंत आपले आयुष्य जगू शकतात ही बाब गेल्या काही वर्षांपासून स्पष्टपणे दिसून येत आहे, पण तरीही या क्षेत्रात अजून बऱ्याच सुधारणा होणे गरजेचे आहे.



डॉ. विक्रम राऊत, कन्सल्टन्ट – एचपीबी आणि लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जरी, अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई म्हणाले, ‘’आम्ही अशा कितीतरी केसेस पाहिल्या आहेत ज्यामध्ये रुग्ण जिवंत राहू शकेल याची शक्यता खूपच कमी होती. त्यानंतर त्यांचे प्रत्यारोपण केले गेले आणि मग ते स्वतःचे सर्वसामान्य आयुष्य खूपच उत्तम प्रकारे जगत आहेत.

पुढे डॉ.राऊत म्हणाले की , आपल्यासोबत आज श्री. दिलीप सेल आहेत.ते एक पोलीस अधिकारी आहेत आणि इथे अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईमध्ये त्यांचे यकृत प्रत्यारोपण करण्यात आले होते. सर्जरीसुद्धा यशस्वी झाली.त्यानंतर त्यांनी आपले सामान्य जीवन जगायला सुरुवात केली आणि काही महिन्यांच्या आत त्यांना नोकरीमध्ये प्रमोशन देखील मिळाले.

यकृत प्रत्यारोपणानंतर पोलीस सब इन्स्पेक्टर – मालाड पोलीस स्टेशन श्री. दिलीप सेलम्हणाले की “मला यकृताचा आजार बऱ्याच काळापासून त्रास देत होता. दुर्भाग्याची बाब म्हणजे मला हेपेटायटिस बी आणि कोविड-१९ चे देखील निदान केले गेले. जेव्हा डॉ विक्रम राऊत यांनी यकृत प्रत्यारोपणाचा सल्ला दिला तेव्हा माझी शूर मुलगी पुढे आली आणि तिने आपल्या यकृताचा हिस्सा दान करून माझा जीव वाचवला. आता मी माझे सर्वसामान्य आयुष्य जगतो आहे, इतकेच नव्हे तर, मला काही महिन्यांच्या आत प्रमोशन देखील मिळाले. डॉ विक्रम राऊत यांनी मला जीवन जगण्याची दुसरी संधी मिळवून दिली.”

Daughter donates liver and gives life to father; The surgery took place at Apollo Hospitals Navi Mumbai

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात