विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात वादळी वा-यासह पावसाची शक्यता हवामान विभागाचा अंदाज ; गुरुवार, शुक्रवार, शनिवारी पाऊस पडण्याची शक्यता


येत्या तिन ते चार दिवसांत राज्याच्या बहूतांश भागात वादळी वारा आणि विजेच्या कडकटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.


विशेष प्रतिनिधी

पुणे – येत्या तिन ते चार दिवसांत राज्याच्या बहूतांश भागात वादळी वारा आणि विजेच्या कडकटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. वातावरणातील बदलामुळे हा पाऊस होण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याच्या बहूतांश जिल्ह्यालाला याचा फटका बसण्याची शक्यता आहे.Next three to four days prediction of mansoon in Maharashtra says weather department

भारतीय हवामान विभागातर्फे येत्या चार दिवसांच्या हवामानाचा अंदाज जाहिर करण्यात आला आहे. २१, २२, २३ आणि २३ तारखेला वादळी वा-यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यांच्या बहूतांश जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तापमान वाढले आहे. यामुळे एकीकडे जिवाची लाही होत आहे.



मात्र, या उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होत आहे. उष्णतामान कमी अधिक होत आहे. याचाच परिणाम येत्या काही दिवसांत दिसण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सांगली, सातारा, कोल्हापुर, सोलापूर येथे तर मराठवाड्यात औरंगाबाद, उस्मानाबाद, लातूर, जालना, परभणी आणि संपूर्ण विदर्भाला ‘एलो अलर्ट’ हवामान विभागातर्फे सांगण्यात आला आहे. तर उत्तर महाराष्ट्रात वातावरण हे नेहमी प्रमाणे राहणार आहे.

यंदा चांगला पाऊस

यंदा भारतीय हवामान विभातर्फे चांगला पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जवळपास ९९ टक्के पाऊस पावळ्यात होण्याची शक्यता आहे. याचा फायदा खरीप हंगामातील पिकांना होणार आहे. यामुळे या वर्षी बळीराजाला चांगल्या उत्पन्नाची आशा आहे.

Next three to four days prediction of mansoon in Maharashtra says weather department

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात