Devendra Fadnavis : महानगर विकासाची नवी रणनीती! दोन टप्प्यांत पायाभूत सुविधा आखण्याचे निर्देश

Devendra Fadnavis

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे घेतली बैठकी


विशेष प्रतिनिधी

मुंबई : Devendra Fadnavis मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांच्या आढावा बैठक घेतली. या बैठकीत नवीन शहरांच्या विकासासाठी आवश्यक पायाभूत सुविधा दोन टप्प्यात विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला.Devendra Fadnavis

पहिल्या टप्प्यात रस्ते, मलनिस्सारण, पाणीपुरवठा, वीजपुरवठा, स्मशानभूमी आणि दफनभूमी यांचा समावेश करण्यात यावा, तर दुसऱ्या टप्प्यात अन्य सुविधा विकसित कराव्यात. नवीन शहरांत १८ मीटर रुंदीचे रस्ते असावेत आणि भविष्यातील लोकसंख्येचा विचार करून योजना आखाव्यात, यासह मुख्यमंत्री यांनी पुढील निर्देश दिले.



नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण –

१.सोंडापार येथे प्राधिकरणाच्या प्रस्तावित कार्यालय व कर्मचारी निवासी संकुलाच्या व्यवहार्यता अभ्यासावी
२.शहरात फुलांचे मार्केट उभारण्यासाठी जागा ताब्यात घ्यावी.

नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण –

१.सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी शासकीय जागा राखीव ठेवावी.
२.कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विशेष विकास योजना तयार करावी.
३.‘स्पिरीच्युअल सिटी’साठी आवश्यक जागा संपादनाची प्रक्रिया गतिमान करावी.

छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण –

१.औद्योगिक व पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी विशेष योजना तयार करण्याचे निर्देश.
२.शहराजवळील औद्योगिक क्षेत्र व पर्यटन स्थळांना जोडणारे प्रशस्त रस्ते विकसित करावेत.

या बैठकीला यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांतदादा पाटील, मंत्री संजय शिरसाट, राज्यमंत्री माधुरी मिसाळ आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

New strategy for metropolitan development Instructions to plan infrastructure in two phases

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात