सप्तशृंगी मंदिराने जारी केली नवी नियमावली , लस घेतली नाही तर दर्शनही नाही

वय वर्ष १० पेक्षा कमी तसेच वय वर्ष ६५ पेक्षा अधिक वयाच्या भाविक तसेच ग्रामस्थ यांना श्री भगवती मंदिरात प्रवेश बंद करण्यात आला आहे.New rules issued by Saptashrungi temple, no vaccination, no darshan


विशेष प्रतिनिधी

नाशिक : सध्या कोरोनाने सगळीकडे हाहाकार माजवला आहे.त्यामुळे प्रशासन सावध झाले आहे.दरम्यान साडेतीन शक्तीपिठांपैकी अर्धे स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या सप्तशृंगी – वणी गडावर प्रशासनाने पुन्हा निर्बंध जारी केले आहे.आता कोविड लस घेतलेल्यांनाच दर्शन मिळणार आहे.लसीकरणाचे किमान १ किंवा २ डोस पूर्ण केलेल्या भाविकांना श्री भगवती मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे.

तसेच वय वर्ष १० पेक्षा कमी तसेच वय वर्ष ६५ पेक्षा अधिक वयाच्या भाविक तसेच ग्रामस्थ यांना श्री भगवती मंदिरात प्रवेश बंद करण्यात आला आहे.ज्या भाविकांना श्री भगवती मंदिर दर्शन रांगेत रोप वे अथवा पायी मार्गे प्रवेश करावयाचा असेल त्यांना लसीकरणाचे तपशील प्रवेशद्वारावर उपस्थित कर्मचारी वर्गाला सादर करणे अथवा दाखविणे बंधनकारक आहे.



संस्थेने www.ssndtonline.org संकेस्थळावर ई दर्शन पास उपलब्ध करून दिले आहेत. भाविकांनी ई-दर्शन / ऑनलाईन दर्शन पासच्या माध्यमातून दर्शन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

New rules issued by Saptashrungi temple, no vaccination, no darshan

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात