
वृत्तसंस्था
नवी दिल्ली – केंद्र सरकारच्या नव्या शैक्षणिक धोरणानुसार ‘समग्र शिक्षा अभियान – २’ ची आखणी करण्यात आली आहे. या योजनेस मोदी सरकारने २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली असून त्यासाठी २ लाख ९४ हजार २८३ कोटी रूपयांचा निधी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केला आहे, अशी माहिती शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली आहे. मोदी सरकारने आज जे निर्णय घेतले त्यापैकी हा महत्त्वाचा आणि दूरगामी परिणाम करणारा निर्णय आहे. new education policy applied in samagra shiksha abhiyan, modi govt extends abhiyan up to 2026
केंद्र सरकारच्या या निर्णयाचा लाभ देशभरातील सरकारी आणि अनुदानित ११.६ लाख शाळा, १५.६ कोटी विद्यार्थी आणि ५७ लाख शिक्षकांना होणार आहे.
‘समग्र शिक्षा अभियान २’ मध्ये नव्या शैक्षणिक धोरणातील तरतुदींचा अंतर्भाव करण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांना वयाच्या तिसऱ्या वर्षापासून प्ले स्कूलच्या माध्यमातून शिक्षण, विद्यार्थ्यांची सुरक्षितता, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना वाहतुकीसाठी विशेष इन्सेन्टीव्ह, अर्ध्यातच शिक्षण सोडणाऱ्या १६ ते १९ वर्षे वयोगटासाठी विशेष योजना, क्रिडासंस्कृती वाढविण्यास महत्व, कृत्रिम बुद्धिमत्ता, कोडिंग आदी विषयांचा अंतर्भाव असणार आहे.
यातून भारताची नवी पिढी नव्या जगाच्या नव्या आव्हानांना सक्षमपणे सामोरी जाण्यासाठी तसेच नव्या जगातली संधी भारतीयांना उपलब्ध होण्यासाठी देखील होईल, असे धर्मेंद्र प्रधान यांनी स्पष्ट केले.
new education policy applied in samagra shiksha abhiyan, modi govt extends abhiyan up to 2026
महत्त्वाच्या बातम्या
- धक्कादायक : काँग्रेसच्या माजी आमदाराच्या मुलाचे इस्लामिक स्टेटशी संबंध! NIA ने केली छापेमारी
- राहुल गांधींनी दिल्लीतील बलात्कार पीडितेच्या आईवडिलांच्या फोटोसह ट्वीट केले, संबित पात्रांनी पत्रपरिषदेत धो-धो धुतले
- Tokyo Olympics : सेमीफायनलमध्ये भारतीय महिला हॉकी संघाचा अर्जेंटिनाकडून पराभव, ब्राँझ मेडलच्या आशा कायम