पुणे स्टेशन जवळ रेल्वे हाॅस्पिल परिसरात जनसेवा शाैचालय येथे १२ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर ओळखीतील एका व्यक्तीने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
विशेष प्रतिनिधी
पुणे -महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत मागील काही दिवसात पुणे शहरात वाढ झाल्याचे दिसून येत असल्याने महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एेरणीवर आला आहे. पुणे स्टेशन जवळ रेल्वे हाॅस्पिल परिसरात जनसेवा शाैचालय येथे १२ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर ओळखीतील एका व्यक्तीने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. Near Pune railway station in public toilet १२ years girl raped by ३५ yrs accused
याप्रकरणी बंडगार्डन पाेलीस ठाण्यात मारवाडी नावाच्या ३५ वर्षीय इसमावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पिडित मुलीच्या ३६ वर्षीय आईने पाेलीसांकडे आराेपी विराेधात फिर्याद दिली आहे. पिडित मुलगी आठ एप्रिल राेजी दीड वाजण्याच्या सुमारास जनसेवा शाैचालय याठिकाणी गेली हाेती. त्यावेळी आराेपी तिच्या पाठीमागून आला व त्याने मुलीस टाॅयलेट मध्ये खाली पाडून ती अल्पवयीन आहे हे माहिती असताना सुध्दा तिच्याशी जबरदस्तीने शारिरिक संबंध केले आहे. याबाबत बंडगार्डन पाेलीस पुढील तपास करत आहे.
बंडगार्डन पाेलीस ठाण्याचे वरिष्ठ पाेलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी सांगितले की, पिडित मुलीचे पालक हे शाैचालय साफसफार्सचे काम करत असून आराेपी हा रेल्वे स्टेशन परिसरात चहा विक्री, मजुरीचे काम करताे. संबंधित कुटुंबीयांचे ओळखीतील ताे हाेता. आराेपी याने अल्पवयीन मुलीस प्रेमाच्या जाळयात ओढल्याची बाब चाैकशीत समाेर आली आहे. मुलगी अल्पवयीन असताना तिच्याशी शारिरिक संबंध केल्याप्रकरणी त्याच्यावर बलात्कार व पाेक्साेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App