घराजवळ राहत असलेल्या एका कुटुंबातील मांजराचे पिल्लू सतत ओरडत असल्याने त्याचा राग येऊन एका महिलेने सदर मांजराचे डाेक्यात हातातील काठीने मारुन त्यास जिवे ठार मारण्याचा प्रकार गाेखलेनगर परिसरात घडला आहे.Small cat barking everytime the gokhlenagar residents women anger and beaten the cat & murder her
विशेष प्रतिनिधी
पुणे – घराजवळ राहत असलेल्या एका कुटुंबातील मांजराचे पिल्लू सतत ओरडत असल्याने त्याचा राग येऊन एका महिलेने सदर मांजराचे डाेक्यात हातातील काठीने मारुन त्यास जिवे ठार मारण्याचा प्रकार गाेखलेनगर परिसरात घडला आहे. याप्रकरणी शिल्पा निळकंठ शिर्के (रा.गाेखलेनगर,पुणे) या महिलेवर चतुश्रृंगी पाेलीस ठाण्यात भादंवि ४२९, प्राण्यांना क्रुरतेचे वागण्याचे अधिनियम १९६० कलम ११ (१) (अ) (एल) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत गाेखलेनगर येथेच राहणाऱ्या प्रशांत दत्तात्र्य गाठे (वय-५६) यांनी पाेलीसांकडे तक्रार दाखल केली आहे. प्रशांत गाठे यांच्या घराजवळ शिल्पा शिर्के राहण्यास असून सदर ठिकाणी एक तीन ते चार महिने वयाचे मांजराचे पिल्लू हाेते. सदर पिल्लू सतत आवाज करत असल्याने तसेच ते शिर्के यांचे घरात गेले हाेते.
ते घेऊन येण्याकरिता प्रशांत गाठे शिर्के यांचे घरी गेले असता शिल्पा शिर्के यांनी मांजराचे पिल्लाचे डाेक्यात हातातील काठीने मारुन जिवे ठार मारले आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आराेपी महिला पसार झाली असून पाेलीस तिचा शाेध घेत आहे. याबाबत चतुश्रृंगी पाेलीस पुढील तपास करत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App