संतप्त एसटी कर्मचाऱ्यांची दगडफेक आणि चप्पल फेक सिल्वर ओकच्या दिशेने झाली हे दगड आणि चपला सिल्वर ओकच्या रस्त्यावर पडलेत. पण त्यांच्या राजकीय लाभाची फळे मात्र राष्ट्रवादीच्या दिशेने येताना दिसत आहेत.Angry ST staff throwing stones and slippers throwing silver oak
काल दुपारी तीन वाजल्यानंतर संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी सिल्वर ओकच्या दिशेने हल्लाबोल करत दगड आणि चपला भिरकावल्या. यातून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली. शरद पवार यांच्या घरावर हल्ला झाला, अशा बातम्या आल्या. राजकीय वर्तुळातून प्रचंड निषेधाचे सूर उमटले. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी वेगवेगळ्या ठिकाणी पण एका सूरात पोलीस यंत्रणांवर अपयशाचा ठपका ठेवला. या सर्व राजकीय पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कार्यकर्ते मात्र प्रचंड भडकले. आपल्या नेत्याच्या घरावर हल्ला झाल्याचे पाहून त्यांनी काल आणि आज दिवसभर महाराष्ट्रातल्या जिल्ह्या जिल्ह्यात गावा गावात आंदोलने केली निदर्शने केली. गुणरत्न सदावर्ते, आमदार सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमांना जोडे मारले. यातून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर “राजकीय फळे” आपल्या पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न केला.
एक प्रकारे राष्ट्रवादीचे हे संपूर्ण महाराष्ट्रभर शक्तिप्रदर्शन ठरले. ठिकाणी राष्ट्रवादीचे मंत्री आमदार खासदार आंदोलनात सामील झाले सुरक्षेच्या कारणासाठी आज शरद पवारांनी महाराष्ट्र केसरी कुस्तीचा दौरा रद्द केला, पण उद्या ते अमरावतीला जाणार आहेत. तेथे 300 पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्तासाठी ठेवण्यात येणार असल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या आहेत. याचाच अर्थ स्वतः शरद पवार आता राजकीय शक्तिप्रदर्शनात उतरणार असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.
– पालघर साधूंचे हत्याकांड
सिल्वर ओकच्या दिशेने दगड आणि चपला भिरकावल्याचा मुद्दा सोशल मीडिया वेगळ्या प्रकारे प्रतिबिंब उमटवून गेला आहे. ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांच्यासह अनेकांना दोन साधूंच्या पालघर हत्याकांडाची आठवण झाली आहे. तिकडे सिल्वर ओकची एक काचही दगडाने फुटली नाही. फक्त त्या दिशेने दगड भिरकावले तर त्याचे राजकारण करू नका असे राष्ट्रवादीचे मंत्री आणि आमदार खासदार म्हणायला लागले. पण पालघर मध्ये दोन साधूंना जमावाने दगडाने आणि लाठ्यांनी ठेचून मारले त्यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या प्रतिक्रिया काय होत्या?, असा सवाल भाऊ तोरसेकर यांनी उपस्थित केला. त्याला अनेकांनी पाठिंबा दिला आहे.
– 124 कुटुंबांकडे कोण पाहणार?
तर दुसरीकडे सुप्रिया सुळे यांना आपल्या आई वडिलांची आणि मुलीच्या सुरक्षिततेची काळजी वाटते. ते स्वाभाविक आहे. पण 124 एसटी कर्मचारी आंदोलनादरम्यान मरण पावले. त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार??, असे सवाल वेगवेगळ्या सोशल मीडिया हँडल वर करण्यात आले आहेत.
तरी देखील सिल्वर ओकच्या दिशेने दगड आणि चप्पल भिरकावल्याचा मुद्दा हाताशी आल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या शहरांमध्ये आणि गावांमध्ये आंदोलनाच्या निमित्ताने संघटनात्मक पातळीवर जोश भरण्याचा प्रयत्न केला राजकीय वस्तुस्थिती आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App