विशेष प्रतिनिधी
मुंबई : बदलापूर येथे शालेत चिमुरडीच्या झालेल्या लैंगिक शाेषणाच्या घटनेने संताप निर्माण झाला आहे. महिला तसेच बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न समाेर आला आहे. विराेधी पक्ष यावरून सरकारला धारेवर धरत आहे. यामध्येच भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे ( Nitesh Rane ) यांनी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आराेप केले आहेत. आदित्य ठाकरेंवर राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग (NCPCR) च्या तीन केसेस दाखल आहेत, असा गंभीर आराेप नितेश राणेंनी केला आहे. याबाबत उद्धव ठाकरेंनी खुलासा न केल्यास मातोश्रीवर मोर्चा आणण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
नितेश राणे म्हणाले की, “एनसीपीसीआर हा लहान मुलांच्या संरक्षणासाठी बनवलेला आयोग आहे. एनसीपीसीआरने आदित्य ठाकरेंविरोधात लहान मुलांना छळण्याबाबत तीन तक्रारी दिल्या आहेत की, नाही? याचा खुलासा उद्धव ठाकरेंनी करावा. आदित्य ठाकरे आणि लहान मुलांचा काय संबंध आहे? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आदित्य ठाकरे आणि लहान मुलांसदर्भातील तीन केसेस त्यांनी दाबल्या. याचं कारण काय?” असा सवाल त्यांनी केला.
राणे म्हणाले की, “बदलापूरमध्ये घडलेल्या निर्घृण घटनेबाबत आमचं सरकार कुठलीही दयामाया न दाखवता आरोपीला फाशी व्हावी, यावर ठाम आहे. पण उद्धव ठाकरेंचं सरकार असताना त्यांच्या मुलाने लहान मुलांसदर्भात केलेल्या घाणेरड्या कृत्यांबाबत जर त्यांनी माहिती दिली नाहीत तर मी पत्रकार परिषद घेऊन एनसीपीआरच्या तिन्ही तक्रारींबाबत माहिती देईल.
उद्धव ठाकरे चिमुकल्या मुलीच्या बलात्काराच्या घटनेचं राजकारण करत आहे. तुमच्या घरातल्या मुलाला आधी आवरा अन्यथा लहान मुलं आणि त्यांच्या पालकांचा मोठा मोर्चा मातोश्रीवर आणेन. तसेच आम्हाला आदित्य ठाकरेंपासून संरक्षण देण्याची मागणी करेन. त्यामुळे दुसऱ्यांवर आरोप करण्याआधी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी आपल्या घरातल्या मुलाला आवरावं,” असेही ते म्हणाले. आदित्य ठाकरेंवरील आराेप तरी काय आहेत हे आपण पाहू. आदित्य ठाकरे यांनी आरे बचाव म्हणत आंदाेलन केले हाेत. या आंदाेलनात लहान मुलांनाही सहभागी करून घेतले हाेते. राजकारणासाठी केलेल्या आंदाेलनात मुलांचा वापर केल्याने आदित्य ठाकरे अडचणीत आले हाेते. बाल हक्क संरक्षण आयाेगाने मुंबईच्या पाेलीस आयुक्तांना नाेटीस पाठवून आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली हाेती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more