शरद पवारांच्या चंद्रपूर दौऱ्याच्या निमंत्रण पत्रिकेत राष्ट्रवादी शहर युवती काँग्रेस प्रमुखाचे नाव का नाही…??


प्रतिनिधी

चंद्रपूर : राष्ट्रवादीचे काँग्रेस अध्यक्ष शरद पवार येत्या 18 ते 19 नोव्हेंबर रोजी विदर्भात चंद्रपूरच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचे या ठिकाणी विविध कार्यक्रम होणार आहेत. त्यांच्या निमंत्रण पत्रिकाही छापण्यात आल्या आहेत.NCP President Sharad Pawar is visiting Chandrapur in Vidarbha

पण पवारांचा हा आगामी दौरा वेगळ्याच कारणांसाठी गाजायला सुरुवात झाली आहे पवारांच्या विविध कार्यक्रमांच्या निमंत्रण पत्रिकांमधून राष्ट्रवादी शहर युवती काँग्रेसच्या प्रमुख वैष्णवी देवतळे यांचे नाव का छापण्यात आले नाही?, याची चर्चा राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरू आहे. या संदर्भातली एक माहिती हाती आली तेव्हा अनेकांना मोठा धक्का बसला.


जेव्हा जेव्हा शरद पवार यांचे सरकार येते तेव्हा अशा दंगली घडतात ; राज्याचे माजी मंत्री अनिल बोंडे यांचा आरोप


गाड्यांची चोरी करून त्या गाड्या विक्री करण्याच्या प्रकरणात वैष्णवी देवतळे नावाच्या युवतीला तिच्या दोन साथीदारांसह चंद्रपूर पोलिसांनी अटक केली. तिच्याकडून सगळी मोडस ऑपरेंडी पोलिसांनी जाणून घेतली त्यावेळी पोलिसांनाही जोरदार धक्का बसला. किल्या नसलेल्या गाड्या विशिष्ट पद्धतीने लॉक उघडून ती निर्जन स्थळी नेऊन मेकॅनिक मार्फत दुरुस्त करून विक्री करत असे. तिचा हा गोरखधंदा उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तिचा व्यवस्थित मागोवा घेतला. त्यावेळी आणखीन एक धक्कादायक बाब पुढे आली ती म्हणजे वैष्णवी देवतळे ही राष्ट्रवादी शहर युवती काँग्रेसचे प्रमुख असल्याचे लक्षात आले. चंद्रपूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये ती बरीच एक्टिव आहे. त्यामुळे पोलिसांनी सुरुवातीला नाव झाकून ठेवले. एबीपी माझाने ही बातमी दिली आहे.

परंतु शरद पवार यांचा येत्या 18 ते 19 नोव्हेंबर रोजी चंद्रपूर दौरा आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने ज्या निमंत्रण पत्रिका छापण्यात आल्या आहेत त्या निमंत्रण पत्रिकांमध्ये वैष्णवी देवतळे हिचे नाव छापण्यात आले नव्हते. ते नाव का छापण्यात आले नाही?, याची चंद्रपूरच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. सोशल मीडियावर अनेक गोष्टी या निमित्ताने व्हायरल झाल्या. यामध्ये वैष्णवी देवतळे ही राष्ट्रवादी शहर युवती काँग्रेसची प्रमुख असल्याचे निदर्शनास आले.

तिला आता पोलिसांनी गाड्यांच्या चोरी प्रकरणात अटक केली आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या कार्यक्रमांमधून तिचे नाव वगळण्यात आले तसेच निमंत्रण पत्रिकांवरही तिचे नाव छापण्यात आले नाही. हा खुलासा झाल्यानंतर चंद्रपूरमध्ये शरद पवार यांच्या दौऱ्याविषयी देखील मोठी चर्चा सुरू झाली आहे.

NCP President Sharad Pawar is visiting Chandrapur in Vidarbha

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात