प्रतिनिधी
मुंबई : सध्या महाराष्ट्रातील सीमा भागातील गावे दुसऱ्या राज्यात जाण्याच्या मागण्या करीत आहेत. त्यात विशेष करून कर्नाटक राज्यातील सीमाभागातील महाराष्ट्रातील गावांची चर्चा आहे. पण या गावांना महाराष्ट्रातून वेगळे होण्याची हूल देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच त्या गावातल्या काही लोकांना फूस देत आहे, असा गंभीर आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला आहे. NCP leaders tricked the villages of Maharashtra into secession
नरेश म्हस्के यांची ट्विट
राष्ट्रवादी जातीपातीचे राजकारण करून महाराष्ट्रात वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रात काही गावे वेगळे होण्याची भाषा करत आहेत. या गावात याआधी समस्या नव्हत्या का? गावकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात काँग्रेस, राष्ट्रवादीचेच नेते असमर्थ राहिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता या गावांच्या समस्या सोडवण्यासाठी पाऊल उचलले आहे. मात्र या गावांना महाराष्ट्रापासून वेगळे करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेतेच फूस देत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र तोडण्याचा डाव आखत आहे. त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार आहे का?, असा सवाल त्यांनी केला.
सध्या राजकारणात छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष राजकारण करत आहे. शरद पवारांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हणण्याची गरज काय?, असे विधान केले होते. त्यात शिवाजी महाराजांचा अपमान नाही का? राष्ट्रवादीचे नेते प्रकाश गजभिये यांनी छत्रपतींचा वेष परिधान करून ऐऱ्यागैऱ्यांना मुजरा करत होते. त्यावेळी छत्रपतींचा अपमान झाला नाही का?
शाहिस्तेखानाचा देखावा करताना छत्रपती शिवाजी महाराजांना शरद मुखचंद्र लावून राष्ट्रवादीने अधिकृत ट्विट केले होते. छत्रपतींची तुलना पवारांनी केली होती. शरद पवार कधी कोणत्या गडकिल्ल्यावर गेलेत का? सत्तेत गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी काय केले?, असे एका पाठोपाठ एक टोले नरेश म्हस्के यांनी आपल्या ट्विट मधून लावले आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App