विशेष प्रतिनिधी
मुंबई : अजितदादांच्या फसलेल्या किंवा चालू असलेल्या बंडाच्या अनेक कहाण्या मराठी माध्यमांमध्ये रंगत असल्या तरी त्यातले एक अत्यंत महत्त्वाचे किंबहूना कळीचे सूत्र मराठी माध्यमे दडवून ठेवत आहेत, ते सूत्र म्हणजे “गमावलेली सत्ता मिळवण्यासाठी तडफड झाली थंड”, हे आहे. म्हणूनच ते शीर्षक लिहिले आहे!! NCP failed to grab power from backdoor again in 2023 as it happened in 2014, 2019
2014 मध्ये काँग्रेस – राष्ट्रवादीची सत्ता गेली काँग्रेसने वास्तव स्वीकारले, पण राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला ते पचवणे अवघड गेले आणि त्यांनी भाजपने न मागताच फडणवीस सरकारला पाठिंबा देऊ केला होता. 5 वर्षांनंतर शरद पवारांनी त्याचा खुलासा केला, की त्यावेळी जुळत असलेल्या भाजप शिवसेनेच्या संधानाला सुरुंग लावण्यासाठी भाजपने न मागताच आपण त्या सरकारला पाठिंब्याची ऑफर दिली होती. अर्थातच ती ऑफर त्यावेळी भाजपने फेटाळली. राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला नाही. उलट राष्ट्रवादीच्या पाठिंबामुळे राष्ट्रवादीने न मागताच दिलेल्या पाठिंबामुळे 63 आमदारांच्या नेत्याची म्हणजेच उद्धव ठाकरेंची बार्गेनिंग पॉवर घटली आणि त्यांना किरकोळ काही मंत्री पदे स्वीकारून भाजप सरकार मध्ये सामील व्हावे लागले होते. 2014 चा राष्ट्रवादीचा गेलेली सत्ता मिळवण्याचा प्लॅन तसा फसला होता.
2019 मध्ये हाच धडपडाट करण्यात आला. 2014 मध्ये राष्ट्रवादीचे आमदार संख्या 42 होती ती 2019 मध्ये वाढून 53 झाली. 11 ने बळ वाढले. पण सत्तेचा सूर्य कुठे दिसण्याची शक्यता नव्हती. पण भाजप – सेनेच्या मैत्रीला कात्री लावण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आणि दरम्यानच्या काळात पहाटेचा शपथविधी उरकण्याची युक्ती सुचली. ती युक्ती नंतर फसली. पण शिवसेनेबरोबरचा जुगाड अडीच वर्षांपुरता करण्यात यशस्वी ठरली. त्या अडीच वर्षात राष्ट्रवादीचे विशिष्ट राजकीय भांडवलीकरण होऊ शकले. 2014 पासून गेलेला वाटा सत्तेतला वाटा मिळवता आला, पण तो फक्त अडीच वर्षेच टिकला.
2023 मध्ये राष्ट्रवादीचा सत्तेचा वाटा जाऊन 9 महिने उलटलेत. शिंदे – फडणवीस सरकार स्थिर झाले. पण या स्थैर्यातच राष्ट्रवादीतली अस्थैर्याची बीजे फोफावली. त्याला बंडाची बोंडे धरू लागली. मग शिंदे – फडणवीसांच्या मैत्रीला रात्री लावायला नको का??, ती तर लावलीच पाहिजे. मग अजितदादांच्या दुसऱ्या बंडाचे स्क्रिप्ट लिहिले गेले. पण तेही आता फसल्यात जमा आहे. कारण शिंदे – फडणवीस मैत्रीला कात्री लागली नाही, उलट आपल्याच पक्षाचे चिरे ढासळण्याची जाणीव झाली.
नेहमीप्रमाणे कचकाऊ राजकारण झाले आणि मराठी माध्यमांमध्ये बंड फसले, माघार घेतली, आमदारांना फोनाफोनी करून संभाव्य बंड रोखण्यात शरद पवार यशस्वी झाले, अशा बातम्या आल्या. पण या कथित बंडातले जे मूलभूत सूत्र होते, “गमावलेली सत्ता परत मिळवण्याचा धडपडाट” झाला आणि तो कचखाऊ राजकारणामुळे फसला, हे “सत्य” मात्र मराठी माध्यमांनी सांगण्याचे टाळले आणि आपली निष्ठा दाखवून दिली!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App