राहुल गांधींची शिक्षेविरोधातील याचिका सूरत कोर्टाने फेटाळली; आता सहारा हायकोर्टाचा!!


वृत्तसंस्था

सुरत : ‘सर्व चोरांची आडनाव मोदी कशी?’ असे वक्तव्य करून शिक्षा झालेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मोदींबाबत केलेल्या या विधानाविरोधात मानहानीच्या खटल्यात राहुल गांधींना गुजरातच्या सूरत सत्र न्यायालायने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. ही शिक्षा रद्द करण्यासाठी राहुल गांधींनी सूरत सत्र न्यायालयात याचिका दाखल केली. ही याचिका गुरुवारी सूरत न्यायालयाने फेटाळून लावत राहुल गांधींना दिलासा देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता राहुल गांधींना हायकोर्टाचा सहारा उरला आहे.Surat court rejects Rahul Gandhi’s plea against sentence; Now Sahara High Court!!



२०१९ साली लोकसभा निवडणुकीच्या प्रचार करताना कर्नाटक दौऱ्यावेळी राहुल गांधींनी एका सभेत मोदींच्या नावाचा उल्लेख करत ललित मोदी, नीरव मोदी यांची नावे घेतली होती आणि सर्व चोरांची आडनाव मोदी कशी काय असतात?, असा सवाल केला होता. याप्रकरणी गुजरातचे भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधींविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता.

त्याच संदर्भात गुजरातमधील सूरत जिल्हा आणि सत्र न्यायालयाने राहुल गांधींना दोन वर्षांनी शिक्षा सुनावली होती. याप्रकरणात राहुल गांधींना तात्काळ जामीन मंजूर झाला होता. पण ही शिक्षा रद्द करण्यासाठी राहुल गांधींना याचिका दाखल केली होती. परंतु सूरत न्यायालयाने त्यांची ही याचिकाच फेटाळून लावली आहे.

राहुल गांधी आता सुरत कोर्टाच्या निकाला विरोधात हायकोर्टात धाव घेण्याची शक्यता आहे.

Surat court rejects Rahul Gandhi’s plea against sentence; Now Sahara High Court!!

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात