Sharad Pawar : राज्यात कोरोनामुळे उद्वभवलेल्या अभूतपूर्व संकटात शासनाच्या तिजोरीवरही मोठा ताण निर्माण झाला आहे. याकरिता याआधी महाराष्ट्र काँग्रेसने लसीकरणासाठी मुख्यमंत्री सहायता निधीला मदत जाहीर केली होती. यानंतर आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपल्या पक्षातर्फे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दोन कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. तशा सूचना त्यांनी पक्षनेत्यांना दिल्या आहेत. NCP Donates 2 crore to CM Relief Fund, Sharad Pawar Directs NCP Leader After discharge from hospital
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यात कोरोनामुळे उद्वभवलेल्या अभूतपूर्व संकटात शासनाच्या तिजोरीवरही मोठा ताण निर्माण झाला आहे. याकरिता याआधी महाराष्ट्र काँग्रेसने लसीकरणासाठी मुख्यमंत्री सहायता निधीला मदत जाहीर केली होती. यानंतर आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपल्या पक्षातर्फे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दोन कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. तशा सूचना त्यांनी पक्षनेत्यांना दिल्या आहेत.
शरद पवार यांना नुकताच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. रुग्णालयातून बाहेर येताच शरद पवार यांनी तातडीने पत्र लिहून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पक्षातर्फे आर्थिक मदत जाहीर केली. लसीकरणासाठी मदत व्हावी यासाठी राष्ट्रवादीकडून दोन कोटी रुपयांचा निधी देण्यात येत आहे.
एक महिन्याचे वेतन तसेच राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टतर्फे एक कोटी रुपये इतका मदतनिधी देण्यात यावा अशा सूचना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व कोषाध्यक्षांना दिल्या.@PawarSpeaks @Jayant_R_Patil @AjitPawarSpeaks pic.twitter.com/t4VHH4OXkj — Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) April 30, 2021
एक महिन्याचे वेतन तसेच राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टतर्फे एक कोटी रुपये इतका मदतनिधी देण्यात यावा अशा सूचना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व कोषाध्यक्षांना दिल्या.@PawarSpeaks @Jayant_R_Patil @AjitPawarSpeaks pic.twitter.com/t4VHH4OXkj
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) April 30, 2021
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, ज्यांना शक्य आहे, लसीचा खर्च परवडणारा आहे अशांनी मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करून राज्यावरील आर्थिक भार कमी करावा.
राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा आणि विधान परिषदेचे सर्व आमदार तसेच सर्व खासदार एक महिन्याचे वेतन सीएम फंडात देणार आहेत. लसीकरणासाठी मदत व्हावी यासाठी राष्ट्रवादीकडून एकूण दोन कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीला देण्यात येत आहे.
यापूर्वी काँग्रेस नेते आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा केली होती. थोरात यांनी स्वत:चे एक वर्षाचे वेतन आणि काँग्रेस आमदारांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचा निर्णय घेतला. याशिवाय थोरात यांच्या संगमनेरमधील अमृत उद्योग समूहातर्फे 5 हजार कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाच्या खर्चाचे पैसेही मुख्यमंत्री सहायता निधीला देण्यात येणार आहेत.
NCP Donates 2 crore to CM Relief Fund, Sharad Pawar Directs NCP Leader After discharge from hospital
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App