विशेष प्रतिनिधी
मुंबई : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अनिल देशमुख नवाब मलिक ईडीच्या कोठडीत आहेत. ईडीच्या टार्गेटवर प्राजक्त तनपुरे आणि अर्जुन खोतकर हे राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे मंत्री आहेत. आणि आता राज्यपालांना महाविकास आघाडीने टार्गेटवर घेतले आहे. NCP – Another Shiv Sena minister on ED’s radar
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे अभिभाषण करण्यासाठी विधिमंडळाच्या संयुक्त सभागृहात आले. त्यांनी अभिभाषणाला सुरुवात केली, त्यावेळी सत्ताधारी आणि विरोधक यांच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरु केली. त्यामुळे राज्यपाल अभिभाषण न करताच परतले. त्यानंतर मात्र विधिमंडळाच्या बाहेर सत्ताधारी आणि विरोधक यांनी परस्पर विरोधी मुद्यावर आंदोलन केले.
यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले यांच्या अवमान करणारे राज्यपाल यांनी अभिभाषण न करता निघून गेले, राष्ट्रगीत होण्याचीही प्रतीक्षा केली नाही. त्यामुळे त्यांनी राष्ट्रगीताचा अवमान केला आहे. त्यांना यासाठी दिल्लीकडून सूचना होत्या का, असे सांगत राज्यपालांना परत पाठवण्यासाठी आम्ही सभागृहात प्रस्ताव आणण्याचा विचार करत आहोत, असे पटोले म्हणाले.
आमदार जयंत पाटील यांनी राज्यपालांनी राष्ट्रगीत होण्याची प्रतीक्षा न करता अभिभाषण सोडून निघून गेले, हे आजवर कधीच घडले नव्हते, सभागृहात सत्ताधारी सदस्यांनी राज्यपालांचे छत्रपती शिवाजी महाराज कि जय अशा घोषणा करत त्यांचे स्वागत केले मात्र विरोधकांनी घोषणाबाजी करून राज्यपालांच्या भाषणात व्यत्यय आणला, त्यामुळे कदाचित राज्यपाल नाराज होऊन निघून गेले असावेत, असे पाटील म्हणाले.
तर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी, राज्यपाल भाषण करताना सभागृह नीट चालवण्यात यावे, ही जबाबदारी सत्ताधाऱ्यांची असते, मात्र सत्ताधाऱ्यांनी ही जबाबदारी नीट पाळली नाही, राज्यपाल निघून जाण्यासाठी वारंवार राष्ट्रगीत घेण्यात यावे, अशी विनंती करत होते, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले, असे शेलार म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App