वैद्यकीय जामिनावरच्या “तटस्थ” नवाब मलिकांना राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून राजकीय विश्रांती!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर हिच्याशी मनी लॉन्ड्रिग केल्या प्रकरणात दीड वर्षे तुरुंगाची हवा खाऊन वैद्यकीय जामिनावर बाहेर आलेल्या “तटस्थ” नबाब मलिकांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी राजकीय विश्रांती दिली आहे. Nawab Malik “neutral” from both the NCP factions, given political rest by both of them

नवाब मलिक हे मुंबई प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष होते, पण राष्ट्रवादी काँग्रेस तेव्हा अखंड होती. आता अजितनिष्ठ राष्ट्रवादीने नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांना मुंबईचे अध्यक्ष केले, तर शरदनिष्ठ राष्ट्रवादीने माजी नगरसेविका राखी जाधव यांना अध्यक्ष केले, त्यामुळे आपोआपच नबाब मलिक यांना दोन्ही गटांनी राजकीय विश्रांती दिल्यासारखे झाले.

नवाब मलिक तुरुंगातून सुटून बाहेर आल्यानंतर दोन्ही गटातल्या नेत्यांनी त्यांची घरी जाऊन भेट घेतली. नवाब मलिकांची तब्येत बरी नाही. त्यांच्या किडन्या व्यवस्थित काम करत नाहीत या कारणास्तव त्यांना न्यायालयाने वैद्यकीय जामीन मंजूर केला. त्यामुळे ते सध्या विश्रांती घेत आहेत. सध्या ते राष्ट्रवादीच्या कोणत्याच गटात अधिकृतपणे नाहीत.



पण नवाब मलिक अजितनिष्ठ राष्ट्रवादीमध्ये जाणार असल्याच्या बातम्या मध्यंतरी आल्या होत्या. शरदनिष्ठ राष्ट्रवादीचे नेतेही त्यांच्याशी संपर्कात असल्याच्या बातम्या त्यानंतर आल्या. पण नवाब मलिक अजून तरी तटस्थ आहेत आणि घरी विश्रांती घेत आहेत, त्यामुळे तसेही राष्ट्रवादीचे मुंबईतले काम ठप्प झाले होते, पण आता राष्ट्रवादीच्या फुटीनंतर दोन्ही गट ऍक्टिव्ह झाले आणि त्यांनी आपापल्या गटाचे नवीन अध्यक्ष नेमले. या सर्व प्रक्रियेतून नवाब मलिक पूर्णपणे बाजूला काढले गेले, असाच त्याचा राजकीय अर्थ आहे.

नवाब मलिक मुंबई राष्ट्रवादी अध्यक्ष असताना पक्षाचा एक हाती किल्ला लढवायचे. ते राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते असल्याने दररोज टीव्हीवर दिसायचे. आपण भाजपला सळो की पळू करून सोडू!! असे ते नेहमी म्हणायचे. हसीना पारकरशी मनी लॉन्ड्रीग केल्याच्या प्रकरणात त्यांना ईडीने अटक केल्यानंतर देखील ते बधले नव्हते. उलट ईडी ऑफिसच्या बाहेर उभे राहून हाताची मूठ उंचावून दाखवत ते आपण लढणार असे म्हणत होते, पण दीड वर्षे ते ईडीच्या कोठडीत राहिले. त्याचा परिणाम त्यांच्या तब्येतीवर झाल्याचे सांगितले गेले. आता राष्ट्रवादीने त्यांच्या राजकीय तब्येतीवरही परिणाम करत त्यांना बाजूला काढले.

Nawab Malik “neutral” from both the NCP factions, given political rest by both of them

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात