विशेष प्रतिनिधी
नाशिक : Radhanath Swami Maharaj शारदीय नवरात्राच्या पावन पर्वात रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने उद्या (ता. 10 ऑक्टोबर) संत दर्शन सोहळा आणि श्री गोदावरी महाआरती आयोजित केली असून या महाआरतीला “इस्कॉन” या आंतरराष्ट्रीय संस्थेचे प्रमुख आणि “तुषार्त पथिक” या आंतरराष्ट्रीय बेस्ट सेलर पुस्तकाचे लेखक पूजनीय संत राधानाथ स्वामी महाराज ( Radhanath Swami Maharaj ) विशेषत्वाने उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या आणि “इस्कॉन” संस्थेचे दोन वरिष्ठ संत पूज्य गौरांग प्रभूजी आणि पूज्य शिक्षाष्टकम् महाराज यांच्या हस्ते श्री गंगा गोदावरीची सायंकाळी 6.30 वाजता महाआरती होणार आहे. त्याच वेळी संत दर्शन सोहळा समितीने आयोजित केला आहे.Radhanath Swami Maharaj
नाशिककरांसाठी हा मोठा अनुपम्य सोहळा होणार असून या सोहळ्यासाठी हजारोंच्या संख्येने नाशिककरांनी रामतीर्थ गोदावरी येथे उपस्थित राहावे, असे आवाहन रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने केले असून समितीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते या सोहळ्यासाठी मेहनत घेत आहेत.
रामतीर्थ गोदावरी सेवा समिती गेल्या आठ महिन्यांपासून नित्य नियमाने रामकुंडावर दुतोंड्या मारुतीपाशी रामतीर्थावर रोज सायंकाळी गोदावरी आरती आयोजित करत असून हजारो नाशिककर गंगा गोदावरीच्या प्रार्थनेसाठी आणि या आरतीचा लाभ घेण्यासाठी तिथे उपस्थित असतात.
या महाआरतीसाठी आतापर्यंत समाजाच्या विविध स्तरातील गणमान्य व्यक्तींनी हजेरी लावली असून त्यामध्ये उद्योगपती, शासकीय तसेच खासगी संस्था, संघटनांमधील विविध अधिकारी, सामाजिक, राजकीय, अध्यात्मिक, आरोग्य, क्रीडा आणि अन्य सामाजिक संस्थांमधील सन्माननीय व्यक्ती यांचा समावेश आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App