लावालावी करणे हेच संजय राऊत यांचे काम, नारायण राणे यांची टीका

विशेष प्रतिनिधी

मुंबई : संजय राऊत हे शिवसेनेचे की राष्ट्रवादीचे, त्यांचे नेते शरद पवार की उद्धव ठाकरे? असे प्रश्न उपस्थित करत हे लावालावी करायचं काम त्याचं नाव संजय राऊत अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे.Narayan Rane’s criticism on Sanjay Raut

राणे म्हणाले, भाजपाने देशातील ऐक्य बिघडवण्याचं काम काही केलेलं नाही. पण काही लोकांचे गुपचूप हे व्यवसाय सुरू असतात, हे राजकारण चालू असतं. मला कळत नाही संजय राऊत कोणत्या पक्षात आहेत, राष्ट्रवादीत आहेत, त्यांचे नेत शरद पवार आहेत की शिवसेनेत आहेत, उद्धव ठाकरे त्यांचे नेते आहेत, काही कळत नाही.



ते दिल्लीत पवारांच्याच कार्यालयात असतात. त्यामुळे पक्षाशी प्रामाणिक नाही, निष्ठा नाही. आव आणायचं काम ते करत आहेत आणि ते दाखवताय तसे नाहीत. जे काय बोलतात ते कुठल्याही वृत्तपत्राचा संपादक अशा भाषेत नाही बोलू शकत. जी भाषा मार्गदर्शक नाही, लोकांचं प्रबोधन करणारी नाही, विकासात्मक नाही. या विषयावर ते बोलतच नाही. कधी होते शिवसेनेत, काय केलं? हे लावालावी करायचं काम त्याचं नाव संजय राऊत.

राणे म्हणाले, दोन आठवडे झाले केंद्र सरकारचं अधिवेशन सुरू झाल्यापासून आणि अधिवेशन अतिशय सुरळीत चालले आहे. जे कायदे करणारी बिलं आहेत, ती देखील सुरळीत पास होत आहे. शेतकºयांसंबधीचा कायदा रद्द झाला आंदोलन मागे घेण्यात आलं. सर्व काही सुरळीत चाललेलं आहे.

दुदैर्वं एकाच गोष्टीचं की आमच्या काही लष्कारी अधिकाऱ्यांच्या हॅलिकॉप्टरला अपघात झाला, ही एक दुदैर्वी घटना घडली. बाकी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रामधील सरकार देशामसमोर अडचणी तर सर्व सोडवतच आहेत.

करोनावर अनेक उपाय अनेक औषधं आणली गेली आणि त्यामुळे करोना आज नियंत्रणात आला आहे. केंद्र सरकारचा कारभार अतिशय चांगल्यारितीने देशहिताच्या दृष्टीने, भारत आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने चाललेला आहे.

Narayan Rane’s criticism on Sanjay Raut

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात