विशेष प्रतिनिधी
चिपळूण : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये राजकीय राडा सुरू असला तरी नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा चिपळूणात बिनघोर सुरू आहे. Narayan Rane cautioned to file a case if he wrongly quoted and defamed
चिपळूण येथे सकल मराठा समाज मराठा क्रांती मोर्चा तर्फे नारायण राणे यांचा सत्कार करण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची वाट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोकळी करून दिली आहे. तरी मराठा आरक्षण देण्यात आता मागे हटू नये, असे उद्गार नारायण राणे यांनी काढले. आणि मराठा समाजाला प्रोत्साहित केले. आपल्या सत्काराबद्दल नारायण राणे यांनी सकल मराठा क्रांती मोर्चाचे आभार व्यक्त केले. नारायण राणे यांनी स्वतः ट्विट करून सकल मराठा क्रांती मोर्चाचे आभार मानले.
मराठा आरक्षणासाठी नारायण राणे समितीचा अहवाल उपयोगी पडला होता. त्याच्या आधारे देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण मिळवून दिले होते. हायकोर्टात ते आरक्षण टिकले होते. फक्त कोर्टाने त्याची टक्केवारी घटवून १२ टक्के केली होती. याचा उल्लेख सकल मराठा क्रांती मोर्चाच्या संयोदकांनी नारायण राणे यांच्या सत्काराच्या वेळी आवर्जून केला.
चिपळूण येथे सकल मराठा समाज मराठा क्रांती मोर्चा तर्फे सत्कार करण्यात आला त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. दरम्यान मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची वाट मोदीजींनी मोकळी करून दिली आहे तरी आता मागे हटू नये असे प्रोत्साहित केले.#JanAshirwadYatra pic.twitter.com/qa25IYLJt7 — Narayan Rane (मोदी का परिवार) (@MeNarayanRane) August 24, 2021
चिपळूण येथे सकल मराठा समाज मराठा क्रांती मोर्चा तर्फे सत्कार करण्यात आला त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. दरम्यान मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची वाट मोदीजींनी मोकळी करून दिली आहे तरी आता मागे हटू नये असे प्रोत्साहित केले.#JanAshirwadYatra pic.twitter.com/qa25IYLJt7
— Narayan Rane (मोदी का परिवार) (@MeNarayanRane) August 24, 2021
नारायण राणे यांनी मराठा आरक्षण समितीच्या अध्यक्षपदाच्या काळात संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला होता. मराठा समाजाच्या शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणाची कारणे शोधून काढली आणि त्याचा निष्कर्ष मराठा आरक्षण अहवालात मांडला.
त्या आधी जन आशीर्वाद यात्रेचे चिपळूणच्या अभिरुची हॉलमध्ये भाजपातर्फे प्रचंड जल्लोषात स्वागत करण्यात आले. चिपळूण किराणा व्यापारी संघ, चिपळूण नगरपरिषद तसेच लोटे, खेर्डी आणि गाणे खडपोळीच्या औद्योगिक सदस्यांनी आपले निवेदन नारायण राणे यांना सादर केले. त्यांच्या समस्या सोडवण्याची हमी दिल्याची माहिती नारायण राणे यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये दिली.राज्यात शिवसेना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरूद्ध आंदोलन करत आहे. दाेन चार दगड मारून गेले यात काही पुरुषार्थ असा सवाल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App