विशेष प्रतिनिधी
मुंबई : लोकसभा निवडणुकीतील परफॉर्मन्सच्या आधारे महाविकास आघाडीत सगळ्यात मोठा भाऊ बनलेल्या काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लॉबिंग सुरू केल्याचे विदर्भातल्या काँग्रेसच्या बैठकीतून दिसून आले. त्या बैठकीत विदर्भातल्या नेत्यांनी जास्तीत जास्त काँग्रेस आमदार निवडून आणून विदर्भाकडे मुख्यमंत्रीपद खेचून घेण्याची आग्रही मागणी केली. आमदार विकास ठाकरे यांनी त्यासंदर्भात दुजोरा दिला.
विदर्भ नेहमीच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलाय. काँग्रेसला विदर्भाने नेहमीच चांगला हात दिलाय. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे विदर्भातून जास्त खासदार निवडून आलेत. आमदार देखील आम्ही जास्त निवडून आणले की काँग्रेस हायकमांड नैसर्गिक न्यायानुसार विदर्भातूनच मुख्यमंत्री निवडेल, असे विकास ठाकरे म्हणाले. यातूनच नानांचा विदर्भातून मुख्यमंत्री पदासाठी लॉबिंग सुरू झाल्याचा प्रयत्न दिसला. परंतु त्यामुळेच पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई या दोन क्षेत्रांमधून नाना “राजकीय लॉग इन” कसे करणार असा सवाल तयार झाला.
विदर्भा खालोखाल पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईतून काँग्रेसला टप्प्याटप्प्याने चांगले यश दिल्याचा इतिहास आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत निर्णयाकपणे विदर्भ बरोबरच ही दोन क्षेत्रे देखील आपले महत्त्व राखून आहेत. पश्चिम महाराष्ट्रातून आज बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण ही नावे काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदासाठी आघाडीवर आहेत त्यात पहिल्यांदाच नाना पटोले यांची भर पडली आहे.
अशा स्थितीत नानांना विदर्भातून चांगले पाठबळ मिळाले, तिथून मोठ्या संख्येने काँग्रेस आमदार निवडून आले, तरी पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई काँग्रेसला आमदार संख्येत कशी आणि किती साथ देणार??, बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण यांचे लॉबिंग दिल्लीत कुठपर्यंत पोहोचणार??, महाविकास आघाडी जशीच्या तशी टिकून उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नानांच्या लॉबिंगला कसा प्रतिसाद देणार?? आणि त्याहीपेक्षा सर्वांत महत्त्वाचे म्हणजे दिल्लीतले काँग्रेस हायकमांड महाराष्ट्रातल्या घडामोडींवर आपला वचक ठेवण्याच्या दृष्टीने कुणाला प्राधान्य देणार??, या 4 प्रश्नांच्या उत्तरात नानांच्या लॉबिंगचे “राजकीय लॉग इन” अवलंबून आहे, हे उघड गुपित आहे!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App