विशेष प्रतिनिधी
नाशिक : माझी बायको मराठी आहे, माझी सून मराठी आहे, त्यामुळे त्यांच्यापेक्षा चांगलं मराठी माझं आहे. मराठी भाषा समृद्ध आहे. ही फक्त भाषेची समृद्धी नाही म्हणता येणार. माझा, माझ्या वडिलांचा आणि मुलाचा जन्म इथंच झाला. त्यामुळे महाराष्ट्र आणि राज्याचा आम्हाला अभिमान आहे, असा टोला भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेला लगावला आहे.My wife, daughter-in-law Marathi, we only speak Marathi at home, Kirit Somaiya’s Shiv Sena tola
मराठी राजभाषा दिनी नाशिक येथे माध्यमांशी बोलताना भाजपा नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेसह विरोधी पक्षांवर निशाणा साधला. शेलार म्हणाले, सावरकरांचे विस्मरण, गणेशोत्सवावर बंदी अन् ईद मुबारकवाल्यांची मात्र चांदी. अभंग विसरुन कव्वाली ऐकू लागले, टाळ-मृदंगा ऐवजी ढोलंक वाजवू लागले. दाऊदच्या समर्थकांचे गोडवे गातात, उठता बसता हल्ली बियार्णीच हाणतात. मराठीच्या रक्षणाचा आव केवढा आणतात, हल्ली शिव्यांपुरतेच ते मराठीपण जपतात!
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत गेल्या २५ वर्षांत झाले नाही, तेवढे काम गेल्या पाच वर्षात झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मराठी भाषेचा सुदिन लवकरच येईल! गेली २५ वर्षे केंद्रातील सरकारने या विषयावर जेवढं भरी काम करायला पाहिजे होतं, तेवढं केललं नाही.
पण मागील पाच वर्षांमध्ये मी स्वत: देखील याचा भाग असल्याने मी सांगू इच्छितो की जे ठराव, ज्या पद्धतीची माहिती, अधिकची माहिती या सगळ्या गोष्टी केंद्रातल्या आवश्यक असलेल्या मांडणीत करणं, जे २५ वर्षांत झालं नव्हतं ते मागील पाच वर्षांमध्ये झालय आणि आज मी या ठिकाणी हे सांगतोय की, तो सुदिन देखील पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात लगेचच येईल, असं आशिष शेलार म्हणाले.
पोलिसांच्या चौकशीमध्ये कुठलंही राजकीय भाष्य करावं, असा माझा स्वभाव नाही, असे सांगून शेलार म्हणाले, पण एकप्रकारची जी कार्यपद्धतीन झाली आहे की सोशल मीडियावर एखाद्या व्यक्तील लक्ष्य करून त्याच्याविरोधात लिहायचं. मग त्यानंतर काही निवडक वर्तमानपत्रांमध्ये त्याच नेत्यांविरोधात लक्ष्य केलेल्या गोष्टी छापून आणायच्या,
मग त्याविरोधात मुंबईत किंवा राज्यात काही निवडक पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या तक्रारी नोंदवण्यासाठी शिवसेनच्या महिला आघाडीने जायचं. मग त्यानंतर शिवसेनेच्या असलेल्या महापौर या मुंबईच्या महपौर असल्याचं विसरून एका पक्षाच्या नेत्या आहेत, अशा पद्धतीने त्यांनी महिला आयोगाकडे तक्रार करायची आणि मग पोलिसांनी एफआयआर घ्यायचा. शिवसेनेचं हे टुलकिट आहे. पूर्वी नक्षलवादी, अर्बन नक्षल वापरत होते आता शिवसेना वापरतेय.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App