विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : महाविकास आघाडीच्या विजयवीरांची नव्हे, तर पराभूतांची दिल्लीवर “स्वारी”; जोरदार बैठक घेतली वस्तादाच्या घरी!!, असे आज राजधानीत घडले. MVA loose candidate meeting delhi with sharad pawar
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या नव्हे तर, पराभूत झालेल्या पुणे जिल्ह्यातल्या उमेदवारांनी नवी दिल्लीत शरद पवारांच्या 6 जनपथ या निवासस्थानी बैठक घेतली. शरद पवार संसदेच्या अधिवेशनात व्यग्र असल्यामुळे पराभूत उमेदवारांना त्यांच्या भेटीसाठी दिल्ली गाठावी लागली, अन्यथा ते पुण्यातल्या 1 मोतीबाग निवासस्थानी या सगळ्यांना भेटले असते.
सर्व पराभूत उमेदवारांनी शरद पवारांकडे आपापल्या मतदारसंघातील सगळी परिस्थिती सांगून पराभवाबद्दल ईव्हीएम विरोधात सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल करण्याचा आग्रह धरला. त्यावेळी पवारांनी सुप्रीम कोर्टातले वरिष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी फोनवरून चर्चा केली.
ईव्हीएम विरोधात अर्ज दाखल करणाऱ्यांवर सुप्रीम कोर्टाने नुकतेच ताशेरे ओढल्याने शरद पवार अभिषेक मनू सिंघवी आणि अरविंद केजरीवाल यांनी सावध भूमिका ठेवली. सुप्रीम कोर्टाने ईव्हीएम विरोधकांवर ओढलेल्या ताशेऱ्यांखेरीस अन्य कोणते मुद्दे सुप्रीम कोर्टापुढे मांडता येऊ शकतील याची चाचपणी पवारांनी पराभूत उमेदवारांसमोरच अभिषेक मनू सिंघवी आणि केजरीवाल यांच्याशी झालेल्या चर्चेत केली.
या बैठकीला महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार प्रशांत जगताप, अविनाश बागवे, मेहबूब शेख, अशोक पवार, अश्विनी कदम, सचिन दोडके हे उपस्थित होते. त्याचवेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात देखील तिथे आले होते. आज सायंकाळी या सर्व पराभूत उमेदवारांची अभिषेक मनू सिंघवी यांच्या समवेत स्वतंत्र भेट होण्याची शक्यता आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App