MVA : महाविकास आघाडीच्या ना बैठका, ना नेते पाहताहेत एकमेकांचे तोंड; पण याद्या आणि दाव्यांचे पतंग हवेत उंच उंच वर!!

MVA

विशेष प्रतिनिधी

मुंबई : MVA महाविकास आघाडीच्या ना बैठका, ना नेते पाहत आहेत एकमेकांचे तोंड; पण उमेदवारीच्या याद्या आणि दाव्यांचे पतंग उडत आहेत हवेत उच वर वर!!, अशी महाविकास आघाडीतल्या तिन्ही घटक पक्षांची आजची राजकीय अवस्था आहे. काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना या तिन्ही पक्षांच्या गेल्या काही दिवसांमध्ये एकत्र बैठका झालेल्या नाहीत. प्रत्येक पक्षाचे वरिष्ठ आणि मधल्या फळीतले नेते स्वतंत्रपणे आपापल्या कार्यक्रमांमध्ये व्यग्र आहेत. ते बऱ्याच दिवसांमध्ये एकमेकांना भेटायच्या साध्या बातम्या देखील समोर आलेल्या नाहीत, तरी देखील महाविकास आघाडीचे “इतक्या” जागांवर एकमत झाले, “तितक्या” जागांवर मतभेद आहेत. तिन्ही पक्षांनी “इतक्या” जागांवर दावे सांगितले. “तितक्या” जागांवर त्यांनी एकमेकांचे दावे मान्य केले, वगैरे आकड्यांचे पतंग मराठी माध्यमे हवेत उंच वर वर उडवत आहेत. या आकड्यांना आणि दाव्यांना ना कुठली अधिकृत मान्यता आहे, ना कोणी त्यांना दुजोरा दिला आहे, तरी देखील आकड्यांचे आणि दाव्यांचे उंच उडालेले पतंग खाली यायला तयार नाहीत. MVA

महाविकास आघाडीचा मुंबईमधील जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास ठरल्याचा दावा माध्यमांनी केला आहे. विशेष म्हणजे कोणत्या मतदारसंघातून कोणता पक्ष आग्रही आहे याची यादी काही माध्यमांनी समोर आणली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा किमान मुंबईमधील जागावाटपाचा फॉर्म्युला ढोबळमानाने आकार घेताना दिसत आहे.  मुंबईतील एकूण 36 जागांपैकी सर्वाधिक जागांवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं आग्रह ठरल्याचं समजतं. त्याखालोखाल काँग्रेस आणि सर्वात कमी जागांसाठी शरद पवारांची राष्ट्रवादी शर्यतीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विशेष म्हणजे मुंबईतील वाटाघाटीमध्ये समाजवादी पक्षासाठीही महाविकास आघाडीकडून एक जागा सोडली जाईल अशी शक्यता आहे.

कोण किती जागांसाठी आग्रही??

मुंबईतील 36 पैकी 20 जाग लढण्यासाठी ठाकरेंची शिवसेना आग्रही आहे. त्याखालोखाल 18 जागांवर काँग्रेस दावा सांगत असून शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एकूण 7 जागांवर आग्रही. त्याचप्रमाणे समाजवादी पार्टीला शिवाजीनगर-मानखूर्दची जागा सोडण्यात येणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

पुन्हा बैठक होणार

महाविकास आघाडीमध्ये मुंबईतील काही जागांवरून अद्यापही तिडा कायम असल्याचे समजते. या जागांसंदर्भातील चर्चेसाठी गणेशोत्सवानंतर पुन्हा बैठक होणार आहे. MVA


Maharashtra :केंद्र सरकारचेही ‘महाराष्ट्र प्रथम, मराठी प्रथम’ हे ब्रिद, महत्वाच्या योजना मान्य, गुंतवणूकीतही वाढ


ठाकरे भाजपाला भिडण्यास तयार

आपलं वर्चस्व असलेल्या जागांवर तिन्ही घटक पक्षांनी दावा सांगितला आहे. मात्र त्यातही विशेष बाब म्हणजे भाजप प्रबळ असलेल्या काही जागांवर कुणीच लढणार नसेल तर ठाकरेंची शिवसेना तिथे लढण्यास उत्सुक असल्याचं त्यांनी इतर दोन घटक पक्षांना कळवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

‘या’ 4 जागांसाठी तिन्ही पक्ष अडून

विधानसभेच्या कुर्ला, वर्सोवा, जोगेश्वरी आणि घाटकोपर पश्चिम या 4 जागांसाठी महाविकास आघाडीतील ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हे तिन्ही आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याचप्रमाणे अणुशक्तीनगरच्या जागेवरून राष्ट्रवादी शरद पवारांचा पक्ष आणि ठाकरेंच्या पक्षात रस्सीखेच दिसून येत आहे.

ठाकरेंची शिवसेना 

शिवडी, भायखळा, वरळी, माहीम,  चेंबूर, भांडुप पश्चिम, विक्रोळी, मागाठाणे, जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, अंधेरी पूर्व, कुर्ला, कलिना, वांद्रे पूर्व, दहिसर, वडाळा, घाटकोपर पश्चिम, गोरेगाव, अणुशक्ती नगर, वर्सोवा

काँग्रेस आग्रही

धारावी,  चांदिवली, मुंबादेवी, मालाड पश्चिम,  सायन कोळीवाडा, कुलाबा, कांदिवली पूर्व, अंधेरी पश्चिम, वर्सोवा, वांद्रे पश्चिम, घाटकोपर पश्चिम, कुर्ला, भायखळा, जोगेश्वरी पूर्व, मलबार हिल, माहीम, बोरीवली, चारकोप

शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही

अणुशक्ती नगर, घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम, वर्सोवा, कुर्ला, अंधेरी पश्चिम, दहिसर

समाजवादी पक्षासाठी सोडली जाणारी जागा – शिवाजीनगर-मानखुर्द

मराठी माध्यमांनी ही यादी दिली असली, तरी प्रत्यक्षात कुठल्याही पक्षाने अधिकृतरित्या मान्य केलेली नाही.

MVA leaders busy in their own programs, media claims seats sharing completed

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात