विशेष प्रतिनिधी
मुंबई : लोकसभा निवडणुकीतल्या यशानंतर विधानसभा निवडणुकीत यश मिळवण्यासाठी महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा जो मुंबईतला फॉर्म्युला बनतो आहे, तो पाहता महाविकास आघाडीच्या मुंबईतल्या जागा वाटपात ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस तोट्यात; पण पवारांची राष्ट्रवादी ना फायद्यात ना तोट्यात!!, अशी अवस्था होऊन बसली आहे.
ठाकरे यांची शिवसेना काँग्रेस आणि पवारांचे राष्ट्रवादी या महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी 3 – 2 – 1 असा फॉर्म्युला स्वीकारल्याची बातमी समोर आली आहे. या फार्मूलानुसार मुंबईतल्या 36 जागांपैकी शिवसेनेच्या वाट्याला 15, काँग्रेसच्या वाट्याला 14 आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला 7 जागा आल्यात. याचा अर्थच ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस तोट्यात गेल्यात, तर पवारांचे राष्ट्रवादी ना फायद्यात, ना तोट्यात!! अशी अवस्था आली आहे.
ADR report : ADRचा अहवाल- देशातील 151 लोकप्रतिनिधींवर महिलांविरुद्ध गुन्ह्यांचा आरोप; राज्यांमध्ये पश्चिम बंगालच्या खासदार-आमदारांविरुद्ध सर्वाधिक खटले
कारण 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपबरोबरच्या युतीमध्ये शिवसेनेने 36 पैकी 19 जागा लढविल्या होत्या, तर राष्ट्रवादी बरोबरच्या आघाडीत काँग्रेसने तब्बल 29 जागा लढवल्या होत्या आणि शरद पवारांच्या अखंड राष्ट्रवादीची फक्त 7 जागांवर बोळवण केली होती. यापैकी काँग्रेसने फक्त 4 जागा जिंकल्या आणि पवारांच्या राष्ट्रवादीने फक्त 1 जागा जिंकली होती. त्याउलट शिवसेना-भाजप युतीच्या पदरात मुंबईतल्या 36 पैकी 31 जागा पडल्या होत्या. त्यामुळे शिवसेना – भाजप युती प्रचंड बहुमताने सत्तेच्या दिशेने गेली होती.
परंतु 2019 च्या निकालानंतर महाराष्ट्रात फार मोठे राजकीय महाभारत घडले. महाविकास आघाडी अस्तित्वात आली आणि 2024 च्या जागा वाटपापर्यंत चर्चा येऊन ठेपली. पण या जागा वाटप असल्या फॉर्मुल्यामध्ये 3 – 2 – 1 नुसार ठाकरेंच्या शिवसेनेच्या वाट्याला 15 काँग्रेसच्या वाटेला 14 आणि पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला 7 जागा आल्याने ठाकरे आणि काँग्रेस तोट्यात गेले. पवारांना ना फायदा झाला, ना तोटा झाला, अशा खोड्यात महाविकास आघाडीचे घटक पक्ष अडकले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App