प्रतिनिधी
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय वसतीगृहाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव द्यायचे की छत्रपती शाहू महाराज यांचे नाव द्यायचे, याबाबत छात्र भारती संघटनेने वाद निर्माण केला होता. मुंबई विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वस्तीगृहाच्या नामकरणाचा मोठा वाद निर्माण झालेला असताना राज्यपाल यांच्या सूचनेनुसार वसतीगृहाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्यात आले. यासंबंधीचा प्रस्ताव जेव्हा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत चर्चेला आला तेव्हा शिवसेनेचा ठाकरे गट तटस्थ राहिला. Mumbai University International Hostel named after Veer Savarkar
अभाविपच्या मागणीला यश
शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्यापासून दूर गेली आहे, असे सांगत एकनाथ शिंदे गटाचे ४० आमदार शिवसेनेपासून वेगळे झाले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात जेव्हा वीर सावरकर यांचा अवमान व्हायचा तेव्हा त्यावर शिवसेनेच्या आमदारांना काहीही बोलणे शक्य होत नव्हते. उद्धव ठाकरे यांची शिवसेना हिंदुत्वापासून फारकत घेत आहे, याचा प्रत्यय मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीतही आला. या बैठकीत मुंबई विद्यापीठाच्या वसतीगृहाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्यात यावे, असा प्रस्ताव आला. त्यावेळी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे सदस्य यापासून तटस्थ राहिले.
तर छात्रभारतीने या निर्णयाचा विरोध केला. राज्यपालांनी केलेला नामकरणाच्या सूचनेला प्राचार्य भांबरे, सिनेट सदस्य निल हेलेकर, प्राध्यापक गरजे यांनी पाठिंबा दिला होता. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने सर्व प्रथम वसतीगृहाला वीर सावरकर यांचे नाव देण्याची मागणी केली होती.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App