सुषमा अंधारे यांच्या शिवसेना ठाकरे गटातील प्रवेशाचा नेमका राजकीय अर्थ काय??


विनायक ढेरे

सुषमा अंधारे यांच्या शिवसेनेच्या प्रवेशाच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेच्या ठाकरे गटाला नेत्यांचा पुरवठा वाढवण्याचे स्पष्ट झाले आहे. सुषमा अंधारे यांनी शिवसेना पक्षप्रवेश यावेळी केलेल्या भाषणात याची चुणूक दिसून आली आहे. सचिन अहिर यांच्या रूपाने माझ्या माहेरचा माणूस इथे शिवसेनेत माझ्या सहकार्याच्या रूपाने आहे, असे त्या जेव्हा म्हणाल्या तेव्हाच ही बाब अधोरेखित झाली की राष्ट्रवादी काँग्रेसने अतिशय राजकीय चतुराईने शिवसेनेच्या ठाकरे गटाला नेते आणि कार्यकर्त्यांचा पुरवठा सुरू केला आहे!! What is the exact political meaning of Sushma Andhare’s entry into the Shiv Sena Thackeray faction?

– उद्धव ठाकरेंची हिंदुत्व मांडणी

सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरे यांना प्रबोधनकार ठाकरे यांची प्रतिमा भेट दिली. भाजपशी लढण्यासाठी प्रबोधनकारांच्या परंपरेत आपण आलो आहोत, असे त्या म्हणाल्या. यातच बऱ्याच गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटातून बाळासाहेब ठाकरे यांच्या कट्टर हिंदुत्वाला मानणारा वर्ग निघून गेला आहे. तो एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावर एकवटला आहे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आपण हिंदुत्व सोडलेले नाही असे कितीही उच्चरवात सांगत असले तरी बाळासाहेबांपेक्षा वेगळी हिंदुत्वाची मांडणी उद्धव ठाकरे करत आहेत हे स्पष्ट दिसत आहे. उद्धव ठाकरे यांच्या समवेत असलेल्या शिवसेनेत जास्तीत जास्त भरणा आधीच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा दिसून येत आहे.

– राष्ट्रवादीच्या वळचणीला शिवसेना

एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबरचे महाराष्ट्रातले विशेषतः ग्रामीण भागातले आमदार जे वारंवार सांगत होते तेच सिद्ध होत आहे. ते म्हणजे शिवसेनेचा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातला लढा खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेसशी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मधल्या वर्चस्ववादी नेत्यांशी आहे. अशा वेळेला उद्धव ठाकरे जर आपल्याला राष्ट्रवादीशी लढताना रसद पुरवणार नसतील तर आपल्याला दुसरा पर्याय काय उरतो??, असा सवाल शिंदे गटातल्या आमदारांनी केला होता. तो त्यांचा सवाल आजही कायम आहे. पण आता सुषमा अंधारे यांच्या रूपाने राष्ट्रवादीतून शिवसेनेत झालेले इनकमिंग हे शिंदे गटातल्या आमदारांच्या आर्ग्युमेंटला अतिशय बळकटी देणारेच आहे. शिवसेना उद्धव ठाकरे हे शिवसेना राष्ट्रवादीच्या वळचणीला नेऊन बांधत आहेत. भले त्यांचे राजकीय भांडण भाजपशी असेल पण त्यासाठी शिवसेना राष्ट्रवादीच्या वळचणीला मिळून बांधण्याचे कारण काय??, असा जो सवाल शिंदे गटाच्या आमदारांनी केला आहे त्याला परखड उत्तर देण्याऐवजी उद्धव ठाकरे यांनी सुषमा अंधारे आणि त्याआधी सचिन अहिर यांच्यासारख्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना शिवसेनेत प्रवेश देऊन शिंदे गटातल्या आमदारांच्या आरोपांनाच एक प्रकारे पुष्टी दिल्याचे दिसत आहे.– बाळासाहेबांचे पवारांशी जुळले नव्हते

उद्धव ठाकरे यांनी सुषमा अंधारे यांच्या पक्षप्रवेशाच्या वेळेला स्वतःची हिंदुत्वाची व्याख्या जरूर सांगितली. त्यामध्ये पूजा पद्धतीचा उल्लेख केला. पण आमचे हिंदुत्व त्यापलिकडचे आहे असेही सांगितले. पण हे हे सांगताना बाळासाहेबांनी कधीच राष्ट्रवादी काँग्रेसशी अथवा शरद पवारांशी राजकीय दृष्ट्या जुळवून घेतले नाही हे सांगायचे ते सोयीस्कररित्या विसरले किंवा त्यांना ते सांगायचे नव्हते.

– राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्ते शिवसेनेत घुसवणे

उद्धव ठाकरे यांची ही राजकीय अवस्था राष्ट्रवादी काँग्रेसच्या बळकटीकरणासाठी सर्वाधिक अनुकूल आहे. आपले हवे ते नेते आणि कार्यकर्ते शिवसेनेच्या ठाकरे गटात घुसवून ठाकरे गटच एक प्रकारे मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी कॅप्चर करण्याची ही योजना असू शकते. तसे झाल्यास राष्ट्रवादीला शिवसेनेचे पांघरूण घेऊन मुंबई महापालिकेत उत्तम प्रकारे शिरकाव करता येऊ शकतो आणि तसा जर तो केला तर राष्ट्रवादीसाठी मोठी राजकीय भूमी संपूर्ण महाराष्ट्रासाठी उपलब्ध होऊ शकते.

– ठाकरे गटाचे भांडवल फक्त भाषण

शिवसेनेच्या ठाकरे गटाकडे शिंदे गटाला शह देण्यासाठी संजय राऊत यांचे रोजचे पत्रकार परिषद आणि आदित्य ठाकरे यांचा शिवसंवाद दौरा या खेरीज दुसरे भांडवल नाही. पण राष्ट्रवादी काँग्रेस कडे मात्र आपले निवडक नेते आणि कार्यकर्ते शिवसेनेच्या ठाकरे गटात घुसवण्याचे उत्तम राजकीय भांडवल राष्ट्रवादीकडे आहे. यातून शिवसेनेतल्या ठाकरे आणि शिंदे गटात जो संघर्ष होईल त्याचा सर्वाधिक लाभ राष्ट्रवादीला होणार आहे आणि तो विशेषतः मुंबई, ठाणे पट्ट्यात मिळवण्यासाठी राष्ट्रवादीने आपले नेते आणि कार्यकर्ते शिवसेनेच्या ठाकरे गटात घुसवण्याची योजना बनवलेली दिसते. सुषमा अंधारे यांचा शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश हा त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे.

What is the exact political meaning of Sushma Andhare’s entry into the Shiv Sena Thackeray faction?

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात