मुंबईत ठाकरे बंधूंची कडवी झुंज; पुणे पिंपरी चिंचवड मध्ये पवार काका पुतणे पिछाडीवर!!

Thackeray Brothers

विशेष प्रतिनिधी

नाशिक : मुंबईमध्ये ठाकरे बंधूंनी कडवी झुंज दिली असली, तरी पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये पवार काका पुतण्यांच्या राष्ट्रवादीला पिछाडीवर जाणे भाग पडले आहे.

महापालिका निवडणूक यांच्या निकालांच्या सुरुवातीच्या कलांमध्ये मुंबईत ठाकरे बंधू महायुतीला कडवी झुंज देताना दिसत आहेत. मुंबईत भाजप 60, एकनाथ शिंदे यांची शिवसेना 20, उद्धव ठाकरेंची शिवसेना 57, मनसे सात जागांवर आघाडीवर असल्याचे चित्र दिसून आले. सकाळी 11.00 वाजेपर्यंतचे हे चित्र होते.



– पवार काका – पुतणे पिछाडीवर

तर पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली आणि पवार काका पुतण्याच्या दोन्ही राष्ट्रवादींच्या आघाडीला पिछाडीवर ढकलल्याचे चित्र दिसून आले. पुण्यात भाजप 44 तर दोन्ही राष्ट्रवादी मिळून 13 जागांवर आघाडीवर होते. पिंपरी चिंचवड मध्ये भाजप 31, तर पवार काका पुतण्यांच्या दोन्ही राष्ट्रवादी मिळून फक्त आठ जागांवर आघाडी मिळवू शकले आहेत.

मुंबईत ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन शिवसेना आणि भाजपला झुंजविल्याचे चित्र असेल, तर पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये पवार काका पुतण्यांचा प्रभाव भाजपने पुरता झोपवल्याचे चित्र असेल.

Mumbai, the Thackeray brothers are locked in a fierce battl

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात