वृत्तसंस्था
मुंबई : कोरोनची रुग्णसंख्या कमी करण्यासाठी राबविलेला मुंबई पॅटर्न 15 जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. राज्यात 36 पैकी 15 जिल्ह्यात बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे हा निर्णय घेतला आहे. ‘Mumbai pattern’ to be implemented in 15 districts to reduce coronary heart disease
जमेची बाजू म्हणजे 21 जिल्ह्यात बाधित रुग्णांची संख्या ही 1 टक्क्यांपेक्षाही खाली आहे. मात्र 15 जिल्ह्यांत बाधितांच प्रमाण हे 2.2 टक्क्यांपर्यंत आहे. त्यामुळे प्रशासनाने उपाययोजना करण्यासाठी कंबर कसली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या 15 जिल्ह्यात मुंबई पॅटर्न राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार रुग्णांचा शोध घेऊन कोरोना चाचणी होणार आहे. त्यामुळे वेळीच उपचार करणं शक्य होणार आहे. परिणामी रुग्ण लवकर बरे होतील आणि मृत्यूदर देखील कमी होईल, असा विश्वास आहे.
जळगाव जिल्ह्याने मुंबई पॅटर्नचा वापरुन बाधितांचा दर घटवला आहे. त्यामुळे इतर 15 जिल्ह्यात असा पॅटर्न वापरून संख्या कमी करण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App