समीर वानखेडेंविरोधात भ्रष्टाचाराची चौकशी सुरू, न्यायालयात म्हणाले – मला टारगेट केले जातेय, बहीण आणि मृत आईलाही सोडले नाही!

क्रूझ ड्रग्ज प्रकरणात मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्याविरुद्ध खात्यांतर्गत चौकशी सुरू झाली आहे. वानखेडे यांच्यावर शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रगच्या प्रकरणात सोडण्यासाठी 25 कोटींची मागणी केल्याचा आरोप आहे. एनसीबीचे उपमहासंचालक आणि एजन्सीचे मुख्य दक्षता अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितले की, ते स्वत: वानखेडेंविरोधातील तपासावर लक्ष ठेवून आहेत. Mumbai Drugs Case NCB Starts Departmental Enquiry On Sameer Wankhede in Corruption Allegations


प्रतिनिधी

मुंबई : क्रूझ ड्रग्ज प्रकरणात मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्याविरुद्ध खात्यांतर्गत चौकशी सुरू झाली आहे. वानखेडे यांच्यावर शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रगच्या प्रकरणात सोडण्यासाठी 25 कोटींची मागणी केल्याचा आरोप आहे. एनसीबीचे उपमहासंचालक आणि एजन्सीचे मुख्य दक्षता अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितले की, ते स्वत: वानखेडेंविरोधातील तपासावर लक्ष ठेवून आहेत.

चौकशी सुरू असतानाही समीर वानखेडे आपल्या पदावर कायम राहणार का?, असा प्रश्न ज्ञानेश्वर सिंह यांना विचारण्यात आला. या प्रश्नावर ते म्हणाले की, आम्ही नुकताच तपास सुरू केला आहे, त्यामुळे यावर भाष्य करणे घाईचे आहे. सिंह म्हणाले की, एका स्वतंत्र साक्षीदाराने प्रतिज्ञापत्राद्वारे सोशल मीडियावर काही तथ्य प्रसारित केले होते, त्याची दखल घेत डीजी एनसीबीने दक्षता घेतली आहे. आज चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, तथ्य आणि पुराव्यांच्या आधारे निर्णय घेतला जाईल.

वानखेडे म्हणाले – मला आणि कुटुंबाला लक्ष्य केले जातेय

त्याचवेळी क्रूझ ड्रग्ज प्रकरणात, एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे सोमवारी विशेष एनडीपीएस कोर्टात हजर झाले आणि त्यांनी दोन प्रतिज्ञापत्र दाखल केले. त्यांना लक्ष्य करण्यात येत असल्याचे वानखेडे यांनी सांगितले. त्यांची बहीण आणि दिवंगत आईलाही टार्गेट केले जात असल्याचे ते म्हणाले. वानखेडे म्हणतात की, ते तपासासाठी तयार आहेत. खटला कमकुवत करण्यासाठी सर्व काही केले जात आहे. पंचाचे कुटुंब आणि पंच यांच्याबद्दल माहिती शेअर केल्यामुळे त्यांना धोका निर्माण झाला आहे.

प्रभाकर सेलकडून सुरक्षेची मागणी

प्रभाकर सेलने आज मुंबई गुन्हे शाखा कार्यालय गाठले. त्यांनी जॉइंट सीपीला भेटून स्वतःसाठी सुरक्षा देण्याची मागणी केली. प्रभाकर हे केपी गोसावी यांचे अंगरक्षक आहेत. त्यांनी समीर वानखेडे यांच्यावर २५ कोटींची मागणी केल्याचा आरोप केला आहे.

सरकारी वकील अद्वैत सेतना यांनी न्यायालयात पंच म्हणून प्रभाकर यांचा जबाब वाचला. प्रभाकर यांना पंच म्हणून तक्रार करायची असती तर ते कोर्टात करू शकले असते, पण त्यांनी तसे केले नाही, असे ते म्हणाले. प्रभाकर यांनी 22 दिवसांनंतर वेगळ्या माध्यमातून तक्रार दाखल केल्याने अधिकाऱ्यांना वैयक्तिक लक्ष्य केले जात आहे.

Mumbai Drugs Case NCB Starts Departmental Enquiry On Sameer Wankhede in Corruption Allegations

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात